एक्स्प्लोर
Gold Silver Price Today : स्वस्तात मिळतंय सोनं; 48 हजारांहून कमी किमतीत खरेदी करण्याची नामी संधी

Feature_Photo_2
1/7

Gold Price Today : भारतीय बाजारात आज सोन्याचे दर 48000 रुपयांच्या खाली आहे. अशातच कमी किमतीत सोनं खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोन्याच्या किमतींमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. MCX वर सोन्याचे दर 0.44 टक्क्यांच्या तेजीसह 47642 रुपये प्रति 10 ग्राम इतके आहेत.
2/7

याव्यतिरिक्त चांदीच्या किमतींमध्ये (Silver price Today) तेजी पाहायला मिळाली आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीचे दर 0.43 टक्क्यांच्या तेजीसह 62775 रुपयांच्या लेव्हलवर ट्रेड करत आहेत.
3/7

आंतरराष्ट्रीय बाजाराबाबत बोलायचं झालं तर, आज अमेरिकेच्या बाजारात फ्युचर गोल्डमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. 0.3 टक्क्यांच्या तेजीसह येथे सोन्याचे दर 1794.96 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत आहे.
4/7

IBJA च्या वतीनं सोन्या-चांदीचे रेट्स जारी करण्यात आले आहेत. तुम्ही मिस्ड कॉल देऊन आणि अधिकृत वेबसाइटमार्फत गोल्ड आणि चांदीचे लेटेस्ट रेट्स चेक करु शकतात. शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी दर जारी केले जात नाहीत.
5/7

तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन लेटेस्ट रेट्स चेक करु शकता. जेव्हा तुम्ही या नंबरवर मिस्ड कॉल द्याल, त्यावेळी तुमच्या मोबाईलवर एसएमएस येईल. याव्यतिरिक्त तुम्ही ऑफिशिअल वेबसाईट www.ibja.co किंवा ibjarates.com वर भेट देऊ शकता.
6/7

जर तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी जाणार असाल, तर त्यापूर्वी त्याची शुद्धता तपासणं आवश्यक आहे. त्यामुळं सोनं खरेदी करताना सरकारी अॅपचा वापर करा. तुम्ही 'BIS Care App' मार्फत सोन्याची शुद्धता तपासून पाहू शकता.
7/7

याव्यतिरिक्त तुम्ही या अॅपमार्फत तक्रारही करु शकता. या अॅप (App) मध्ये जर लायसन्स, रजिस्ट्रेशन आणि हॉलमार्क नंबर चुकीचा असल्याचं आढळून आलं. तर ग्राहक याची तक्रार लगेचच करु शकतात. या अॅपमार्फतच ग्राहकांना तक्रार दाखल झाल्याची माहितीही मिळते.
Published at : 24 Nov 2021 12:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
