एक्स्प्लोर
Gold and silver price : सोन्या चांदीच्या दरात पुन्हा तेजी, 24 कॅरेट सोन्याचा दर किती?
Gold and silver price : सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ होताना दिसत आहे.
Gold Price
1/10

सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे.
2/10

अमेरिकन जॉब मार्केट डेटा आला आहे. कमकुवत आकडेवारीनंतर अर्थव्यवस्थेत पुन्हा मंदी येण्याची चिन्हे आहेत.
3/10

मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या दरात 1200 रुपयांची आणि सोन्याच्या दरात 100 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली.
4/10

दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 100 रुपयांनी वाढून 74200 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला.
5/10

चांदीबद्दल बोललो तर चांदी 1200 रुपयांनी महाग झाली आहे. 85800 रुपयांवर चांदी गेली आहे.
6/10

24 कॅरेट सोन्याची किंमत 7193 रुपये प्रति ग्रॅम आहे. तर 22 कॅरेटची किंमत 7020 रुपये प्रति ग्रॅम आहे.
7/10

आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याचा दरात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या आठवड्यात स्पॉट गोल्ड प्रति औंस 2497 डॉलर आणि चांदी 28 डॉलर प्रति औंसवर बंद झाली
8/10

फेडरल रिझर्व्ह या महिन्यात व्याजदरात मोठी कपात करण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळं पुन्हा सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
9/10

सोन्या चांदीच्या वाढत्या किंमतीमुळं खरेदीदारांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे.
10/10

आमखी सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published at : 07 Sep 2024 03:14 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























