एक्स्प्लोर
EPFO : ईपीएफओकडून एप्रिल महिन्याची आकडेवारी जाहीर, 19 लाख सदस्यांची नोंदणी, महिला अन् तरुणांच्या संख्येत वाढ, महाराष्ट्र टॉपवर
EPFO : भारतातील संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची खाती ईपीएफओद्वारे व्यवस्थापित केली जातात. एप्रिल महिन्यात नव्या सदस्यांची संख्या वाढली आहे.
ईपीएफओ
1/5

एम्प्लॉईज प्रॉविडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजेच ईपीएफओनं एप्रिल महिन्यात 19.14 लाख सदस्य जोडले आहेत. केंद्रीय श्रम मंत्रालयानं एप्रिल महिन्याचा पेरोल डेटा जाहीर केला आहे. त्यानुसार मार्च 2025 च्या तुलनेत एप्रिल महिन्यात 31.31 टक्के वाढ झाली. तर, एप्रिल 2024 च्या तुलनेत 1.17 टक्के वाढ झाली आहे.
2/5

ईपीएफओकडे 8.49 लाख नव्या सदस्यांची नोंदणी एप्रिल महिन्यात झाली आहे. मार्च महिन्याच्या तुलनेत या संख्येत 12.49 टक्के अधिक वाढ झाली आहे.
3/5

ईपीएफओकडे नव्या सदस्यांची नोंदणी झाली त्यामध्ये 18-25 वयोगटातील सदस्यांची संख्या 4.89 लाख इतकी आहे. मार्चच्या तुलनेत या वयोगटातील सदस्यांच्या नोंदणीमधील वाढ 10.05 टक्के झाली आहे. तर, एकूण सदस्यांची संख्या 7.58 लाख इतकी नोंदणी एप्रिलमध्ये झाली आहे.
4/5

एप्रिल महिन्यातील आकडेवारीनुसार महिलांच्या नोंदणीत देखील वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात 2.45 लाख नव्या महिला सदस्यांची नोंदणी ईपीएफओकडे झाली आहे. मार्च महिन्याच्या तुलनेत 17.63 टक्के वाढ झाली आहे. तर, एकूण नोंदणी 3.95 लाख इतकी आहे.
5/5

ईपीएफओच्या एप्रिल पे रोल डेटानुसार ज्या सदस्यांची नोंदणी झाली त्यामध्ये पहिल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रानंतर कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, हरियाणा, नवी दिल्ली, उत्तर प्रदेश,तेलंगाणा राज्यांचा क्रमांक लागतो.एप्रिल महिन्यात जी पाच राज्य आघाडीवर आहेत त्याची सदस्यसंख्या 11.50 लाख असून महाराष्ट्राचं प्रमाण 21.12 टक्के आहे.
Published at : 22 Jun 2025 07:42 PM (IST)
आणखी पाहा























