एक्स्प्लोर
क्रेडिट कार्डने शॉपिंग कराल तर मिळणार बम्पर सूट, वेगवेगळ्या बँकांच्या क्रेडिट कार्डवर आकर्षक ऑफर्स
गणेशोत्सवानंतर आता वेगवेगळ्या सणांना सुरुवात होते. हीच बाब लक्षात घेता अनेक बँकांनी आपल्या क्रेडिट कार्डवर शॉपिंग तसेच इतर कामांसाठी वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या आहेत.

credit card offers (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/8

Credit Card Offers: सध्या सणांची सुरुवात झाली आहे. सणांसाठी अनेकजण मोठी शॉपिंग करतात. त्यामुळे वेगवेगळ्या बँकांच्या क्रेडिट कार्टच्या माध्यमातून तुम्ही शॉपिंग करू शकता. विशेष म्हणजे या क्रेडिट कार्ड्सवर सणांच्या पार्श्वभूमीवर बँकांनी त्यांच्या क्रेडिट कार्ड्सवर बम्पर सुट दिलेली आहे.
2/8

HDFC Bank, ICICI Bank, Kotak Mahindra Bank, Axis Bank यासारख्या अनेक बँका आहेत, ज्यांच्या क्रेडिट कार्ड्सवर चांगली ऑफर दिली जात आहे.
3/8

एचडीएफसी बँकेच्या VISA Contactless या क्रेडिट कार्डवर 30 ऑक्टोबर 2024 पर्यंत चांगल्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत. या क्रेडिट कार्डच्या मदतीने खरेदी केल्यास 5 ते 15 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत आहे. Mad over donuts आणि Lookwell Salon च्या बिलावर 15 टक्के सूट देण्यात येत आहे.
4/8

कोटक महिंद्रा बँकेच्या क्रेडिट कार्डच्या ईएमआयवर 10 टक्के किंवा जास्तीत जास्त 3,000 रुपयांची सूट दिली जात आहे. या बँकेच्या क्रेडिट कार्डवर शॉपिंग केल्यास 15 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे.
5/8

आयसीआयसीय बँकेच्या प्लॅटिनम कार्डसाठी अॅन्यूअल आणि जॉईनिंग फीवर सूट देण्यात आली आहे. यासह फ्यूल सरचार्जवर सूट दिली जात आहे. यासह या क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड आणि व्हॉऊचर्सचीही ऑफर दिली जात आहे.
6/8

अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डने Max Fashion मध्ये शॉपिंग केल्यास 5 टक्के सूट दिली जात आहे. ही ऑफर 3 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे. अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवरून आयफोन घेतल्यास 8,000 रुपयांची सूट दिली जात आहे. ही ऑफर 2 ऑक्टोबरपर्यंत आहे. Goibibo च्या माध्यमातून विमानाचे तिकीट खरेदी केल्यास, हॉटेल बुक केल्यास 20 टक्के सूट दिली जात आहे. ही ऑफर 25 सप्टेंबरपर्यंत आहे.
7/8

एसबीआयच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून स्विगीवरून ऑर्डर प्लेस केल्यास 100 रुपयांचे डिस्काऊंट देण्यात येत आहे.
8/8

सांकेतिक फोटो
Published at : 14 Sep 2024 03:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
