टीव्ही मालिका 24: कपिलने चित्रपटांव्यतिरिक्त अमेरिकन सीरिज 24 च्या 24 हिंदी रिमेकची ऑफरदेखील नाकारली. या मालिकेत अनिल कपूरने कपिल शर्मालाही काम करण्याची ऑफर दिली होती. पण ही ऑफरही कपिलने नाकारली होती. कपिल म्हणाला की ही मालिका ऑफर झाल्यावर तो खूप खूष होता, परंतु तो स्वीकारू शकला नाही कारण त्याच वेळी त्याला नवीन शो सुरू करायचा होता.
2/6
तेज: 2012 मध्ये अनिल कपूरने कपिल शर्माला 'तेज' चित्रपटाची ऑफर दिली होती पण कपिलनेही ती करण्यास नकार दिला. कपिलने मुबारका आणि तेज यांना नाकारण्याचे कोणतेही कारण दिले नाही, परंतु कपिल शर्मा शोमध्ये पाहुणे म्हणून आलेल्या अनिल कपूरला त्याने सांगितले की तुम्ही मला चांगले चित्रपट ऑफर करत राहा.
3/6
मुबारकां: 2017 मध्ये आलेल्या 'मुबारकां' चित्रपटामध्ये अनिल कपूर, अर्जुन कपूर, इलियाना डिक्रूझ आणि अथिया शेट्टी मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात कपिल शर्मालाही भूमिकेची ऑफर देण्यात आली होती पण त्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला.
4/6
बँक चोर: 2017 मध्ये आलेला बँक चोर हा सिनेमा एक ब्लॅक कॉमेडी होता. बम्पी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटाचं शूटिंग सुरू झाल्यानंतर कपिलने हा चित्रपट नाकारला होता. यश राज यांच्या बॅनरखाली बनलेल्या चित्रपटात नंतर रितेश देशमुख, रिया चक्रवर्ती आणि विवेक ओबेरॉय यांनी मुख्य भूमिका साकारल्या. हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला.
5/6
वो 7 दिन (रिमेक): अनिल कपूर, पद्मिनी कोल्हापुरे आणि नसीरुद्दीन शाह यांच्या 1983 मध्ये आलेल्या 'वो 7 दिन' या सुपरहिट चित्रपटाच्या रिमेकसाठी संपर्क साधला होता. मात्र, मीडिया रिपोर्टनुसार कपिलने 'वो 7 दिन' चा रिमेक करण्यास नकार दिला होता.
6/6
कॉमेडियन कपिल शर्मा त्यांच्या टी्व्ही शोमुळे घराघरात पोहोचला आहे. कपिल शर्मा शोच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून दिसून येतो की त्यांच्या शोसाठी तारकांची रांग लागलेली असते. कपिलच्या या लोकप्रियतेमुळे त्याला बर्याच फिल्म ऑफर झाल्या पण त्याने त्या नाकारल्या.