दिशा पाटनी आणि शिवसेना युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे देखील एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. दिशा आणि आदित्य डिनरसाठी मुंबईतील बे रूट रेस्टॉरंटमध्येही गेले होते.
2/10
भारत चित्रपटानंतर आदित्य रॉय कपूर सोबत दिशाने मलंग या चित्रपटात काम केलं. या चित्रपटात तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला.
3/10
बागी-2 नंतर दिशा पाटनीने सलमान खानसोबत 'भारत' या चित्रपटात काम केलं आहे. सलमान खान आणि दिशा पाटनीचं स्लो मोशन सॉन्ग फार लोकप्रिय झालं आहे.
4/10
टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी अनेकदा इव्हेंट्समध्येही एकत्र दिसून आले.
5/10
टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी यांच्या रिलेशनशिपबाबत दिशाचं म्हणणं होतं की, ते दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दरम्यान, टायगरने दिशाला डेट करत असल्याची वृत्ताला दुजोरा दिला होता.
6/10
त्याचबरोबर दोघांच्या ऑफ स्क्रिन अफेअरच्या चर्चाही सुरु झाल्या होत्या. दोघही एकमेकांसोबत आउटिंग करताना अनेकदा दिसून आले होते.
7/10
2018मध्ये आलेला तिचा चित्रपट बागी-2 रिलीज झाला. या चित्रपटामध्ये तिने टायगर श्रॉफसोबत स्क्रिन शेअर केली होती. या दोघांची ऑनस्क्रिन जोडी चाहत्यांनी फार आवडली.
8/10
दिशाने बॉलिवूडमध्ये एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातून डेब्यू केला. हा चित्रपट खूप गाजला आणि तिच्या अॅक्टिंगची चाहत्यांनी प्रशंसाही केली.
9/10
दिशा पाटनी बॉलिवूडची सर्वात स्टायलिश, हॉट आणि फिट अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर नेहमी आपल्या जिमनॅस्टिक व्हिडीओ शेअर करत असते.
10/10
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी हिचा आज वाढदिवस. ती 28 वर्षांची झाली आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फॅन्स तिच्यावर शुभेच्छांचा वर्षावर करत होते.