एक्स्प्लोर
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : या आठवड्यात तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि प्रेम जीवन कसे असेल? मेष ते कन्या राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Weekly Horoscope 06 to 12 November 2023 saptahik rashibhavishya
1/6

मेष - मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा जड जाईल, कामाचा बोजा तुमच्यावर राहील. यामुळे तुम्ही चिडचिड आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहाल. सणासुदीच्या काळात आरोग्याची काळजी घ्या. बाहेरचे अन्न खाऊ नका. तुमच्या लव्ह पार्टनरच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. विवाहित लोक आपल्या जोडीदाराची विशेष काळजी घेतील.
2/6

वृषभ - वृषभ राशीच्या लोकांना या आठवड्यात सावध राहावे लागणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमचे बोलणे आणि तुमचा स्वभावावर नियंत्रण ठेवावा, अन्यथा तुमचे संबंध बिघडू शकतात. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका, या आठवड्यात तुम्हाला सरप्राईज मिळू शकते. आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.
3/6

मिथुन - मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कठोर परिश्रमाने भरलेला असेल. या आठवड्यात तुम्हाला सर्वांना सोबत घेऊन जावे लागेल. या आठवड्यात सणांवर जास्त खर्च झाल्यामुळे तुमचे खिसे अधिक रिकामे होऊ शकतात. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर तुम्ही सोने खरेदी करू शकता. या आठवड्यात तुमचा व्यवसाय चांगला राहील. आरोग्याची काळजी घ्या.
4/6

कर्क - या आठवड्यात तुम्ही कोणतेही काम सुरू करत असाल तर तुम्हाला तुमची पावले आणि निर्णय अतिशय हुशारीने घ्यावे लागतील. शेअर मार्केट आणि सट्टा बाजारात पैसे गुंतवू नका. तुम्ही प्रवास करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा, तुम्हाला कामाशी संबंधित प्रवासाचा फायदा होणार नाही. वैवाहिक जीवन चांगले राहील.
5/6

सिंह - सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अडचणी आणू शकतो. या आठवड्यात तुमच्यावर काही मोठी जबाबदारी सोपवली जाईल. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर पैशाच्या व्यवहारात काळजी घ्या. महिला या आठवड्यात धार्मिक कार्यावर लक्ष केंद्रित करतील. तुमच्या प्रेमसंबंधांचे लग्नात रुपांतर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून परवानगी मिळेल
6/6

कन्या - कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला जाणार आहे. या आठवड्यात भाग्य तुम्हाला साथ देईल. करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल. जर तुम्ही प्रॉपर्टीच्या कामात असाल तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद राहील. आरोग्य सामान्य राहील. या आठवड्यात तुमचे मन धार्मिक कार्यक्रमात व्यस्त राहील.
Published at : 05 Nov 2023 11:28 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















