एक्स्प्लोर

Dagdusheth Temple : शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त दगडूशेठचा गाभारा लालचुटूक डाळिंबानी सजला; पाहा बाप्पाचे मन प्रसन्न करणारे फोटो

Dagdusheth Temple Pomegranate Decoration : शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

Dagdusheth Ganpati Temple Pomegranate Decoration

1/11
मंदिरात फुलांच्या शेषनागाची आणि डाळिंबांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच दिवसभर विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आलं आहे.

2/11
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला बाप्पांचा पाताळातील अवतार असलेला शेषात्मज गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात आला.

3/11
सोमवारी पहाटे 3 वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक झाला. त्यानंतर पहाटे 4 ते 6 या वेळेत गायक राहुल एकबोटे यांनी स्वराभिषेकातून आपली गायनसेवा अर्पण केली.

4/11
सकाळी 8 ते दुपारी 12 यावेळेत गणेशयाग, दुपारी 1 ते 3 सहस्त्रावर्तनं पार पडली. रात्री 9 ते 11 वेळेत गणेशजागर देखील पार पडला.

5/11
गाणपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणेच ज्येष्ठ चतुर्थीचाही श्रीशेषात्मज जन्मोत्सव महत्त्वपूर्ण मानलेला आहे.

6/11
भगवान ब्रह्मदेव सृष्टी रचनेच्या कार्यात असताना आपल्याच सृष्टीवर मोहित झाले, त्या मोहित अवस्थेत त्यांच्या नासिकेमधून एक बालक जन्माला आले. त्याच्याकडे पाहिल्यानंतर भगवान ब्रह्मदेव अधिकच मायायुक्त झाले.

7/11
परिणामी आपल्या नव्या अपत्याला त्यांनी मायाकर असं नाव दिलं. अनेकानेक वरदान देऊन त्याला परिपुष्ट केलं.

8/11
पुढे विप्रचित्ती नामक राक्षसाने या मायाकराला राक्षसांचा राजा केलं. मायाकराने आपल्या अतुलनीय वरदानांच्या भरवशावर सगळी पृथ्वी आणि स्वर्ग लोक जिंकलं. त्यानंतर त्याने पाताळावर आक्रमण केलं. त्याच्या वरदानासमोर निष्प्रभ झालेल्या भगवान शेषांनी शेवटी भगवान गणेशांचे स्मरण केलं.

9/11
श्रीशेष ध्यान करत असताना त्यांच्या ध्यानातूनच भगवान श्री गणेश श्रीशेषात्मज रूपात ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला मध्यान्य समयी प्रकट झाले. याच अवतारात पुढे गजासुर नामक राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्री गणेशांनी ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, देवी, सूर्य या पंचेश्वरांच्या शक्तिने युक्त असलेले मूषक हे वाहन त्यांना करायला सांगितलं.

10/11
या मूषकावर बसून श्री गणेशांनी गजासुर वध केल्यामुळे याच श्रीशेषात्मज अवताराला श्रीमूषकग असं पण नाव प्राप्त झालं.

11/11
याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता. यानिमित्ताने आज दगडूशेठ गणपती मंदिर सजलं आहे. मंदिरावर शेषनाग प्रतिकृतीची फुलांची सजावट करण्यात आली आहे.

भविष्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अलिबाग JSM कॉलेज निवृत्त प्राध्यापक अविनाश ओक यांची आत्महत्या, धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी

Madhi Kanifnath Yatra : मढीच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा निर्णय प्रशासनाकडून रद्द; सरपंच म्हणाले, पुन्हा ग्रामसभा घेणार पण बंदी घालणारच
मढीच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा निर्णय प्रशासनाकडून रद्द; सरपंच म्हणाले, पुन्हा ग्रामसभा घेणार पण बंदी घालणारच
दे धक्का! ठाकरेंकडून विधानसभा उमेदवाराची हकालपट्टी; माजी मंत्र्‍यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार

घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही; मंत्र्यांसमोरच भैय्याजी जोशींचं वक्तव्य
घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही; मंत्र्यांसमोरच भैय्याजी जोशींचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : विधानसभेतअबू आझमी प्रकरणी जोरदार गदारोळ, विरोधक आक्रमकZero Hour Mahapalika Mahamudde Nashik : नाशिक मनपाला नियोजनाची अॅलर्जी, महापालिकेचे महामुद्दे काय?Zero Hour Mahapalika Mahamudde Chandrapur : महापालिकेचे महामुद्दे, चंद्रपुरात गटार सफाईचे तीनतेराZero Hour : अमेरिकेत पुन्हा अग्नितांडव, कॅरिलोनच्या दक्षिण-उत्तरेत पेटलाय वणवा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अलिबाग JSM कॉलेज निवृत्त प्राध्यापक अविनाश ओक यांची आत्महत्या, धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी
अलिबाग JSM कॉलेज निवृत्त प्राध्यापक अविनाश ओक यांची आत्महत्या, धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी
Madhi Kanifnath Yatra : मढीच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा निर्णय प्रशासनाकडून रद्द; सरपंच म्हणाले, पुन्हा ग्रामसभा घेणार पण बंदी घालणारच
मढीच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा निर्णय प्रशासनाकडून रद्द; सरपंच म्हणाले, पुन्हा ग्रामसभा घेणार पण बंदी घालणारच
दे धक्का! ठाकरेंकडून विधानसभा उमेदवाराची हकालपट्टी; माजी मंत्र्‍यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार
दे धक्का! ठाकरेंकडून विधानसभा उमेदवाराची हकालपट्टी; माजी मंत्र्‍यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार
घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही; मंत्र्यांसमोरच भैय्याजी जोशींचं वक्तव्य
घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही; मंत्र्यांसमोरच भैय्याजी जोशींचं वक्तव्य
आदिती तटकरेंकडून छावाचं स्पेशल स्क्रिनिंग, मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची हजेरी, शिंदेंच्या आमदारांच्या अनुपस्थितीची चर्चा

VIDEO : बघतोच तुला आता! भर विधानसभेत भास्कर जाधव-राम कदम भिडले

Ranya Rao Arrest : पंधरा दिवसांत चारवेळा दुबईवारी अन् सुरक्षेत बायपासची सेटिंग! विमानतळावर 14 किलो सोन्यासह डीजीपींची अभिनेत्री लेक सापडल्याने साऊथ इंडस्ट्री हादरली
पंधरा दिवसांत चारवेळा दुबईवारी अन् सुरक्षेत बायपासची सेटिंग! विमानतळावर 14 किलो सोन्यासह डीजीपींची अभिनेत्री लेक सापडल्याने साऊथ इंडस्ट्री हादरली
मारहाणीचे रिल्स तयार करत आहेत, लोकांना माज आलाय; व्हायरल व्हिडिओवरुन पंकजा मुंडे विधिमंडळात कडाडल्या

Embed widget