एक्स्प्लोर
Horoscope : जानेवारी महिन्यात 'या' राशींच्या करिअरला मिळेल नवी उंची, होईल प्रगती!
January 2023 Horoscope : नवीन वर्षाची सुरूवात झाली आहे. जानेवारी महिना करिअरच्या दृष्टीने अनेक राशींसाठी खूप शुभ असणार आहे.
January 2023 Horoscope photo gallery in marathi
1/10

जानेवारी महिना करिअरच्या दृष्टीने अनेक राशींसाठी खूप शुभ असणार आहे. या राशीच्या लोकांना या महिन्यात त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होणार आहे. 'या' राशींसाठी जानेवारी महिना चांगला राहील.
2/10

2023 वर्षाचा पहिला महिना प्रत्येकासाठी नवीन आशा घेऊन आला आहे. जानेवारी महिना अनेकांच्या आयुष्यात आनंद घेऊन आला आहे.
3/10

या महिन्यात अनेक लोकांना ग्रह आणि नक्षत्रांचा विशेष लाभ होणार आहे. वर्ष 2023 चा पहिला महिना करिअरच्या दृष्टीने अनेक राशींसाठी खूप शुभ असणार आहे.
4/10

कर्क राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना करिअरच्या दृष्टीने चांगला जाणार आहे. या महिन्यात तुम्हाला प्रसिद्धी आणि पैसा या दोन्ही बाबतीत चांगले परिणाम मिळतील. नोकरदार लोकांसाठी हा महिना खूप फायदेशीर असणार आहे.
5/10

तूळ राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना चांगला जाणार आहे. कारण सूर्य आणि बुध तिसऱ्या भावात स्थित आहेत. करिअरच्या क्षेत्रात तुमची मेहनत नक्कीच फळाला येईल. महिन्याच्या मध्यात तुम्हाला चांगली बातमी मिळेल.
6/10

मकर - या महिन्यात बृहस्पति दहाव्या घरात राहील, त्यामुळे तुमचे व्यावसायिक जीवन चांगले राहील. या महिन्यात घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. तुमच्या व्यावसायिक जीवनाला वेळ द्या. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर, जानेवारी महिना तुमच्यासाठी खूप चांगला आहे.
7/10

कुंभ- जानेवारी महिन्यात कुंभ राशीचे लोक करिअरच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करतील. संपत्ती आणि प्रतिष्ठा अनुभवाल. तुमचा सर्वोत्तम काळ महिन्याच्या 15 तारखेनंतर येईल. नोकरीत बढती आणि पगार वाढण्याची शक्यता आहे.
8/10

तूळ राशीच्या लोकांसाठी नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. या महिन्यात तुम्हाला अनेक चांगल्या संधी मिळतील आणि तुम्ही त्यांचा पुरेपूर फायदाही घ्याल. एकंदरीत जानेवारी महिना करिअरच्या क्षेत्रात चांगला जाईल.
9/10

कॉर्पोरेट क्षेत्राशी संबंधित मकर राशीच्या लोकांना या महिन्यात प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तर मेहनत करत राहण्याचा सल्ला दिला जातो. ग्रहांच्या अनुकूल स्थितीमुळे तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता जास्त आहे.
10/10

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 06 Jan 2023 01:38 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























