एक्स्प्लोर
India-Pakistan War : 'या' ग्रहामुळे पाकिस्तान भोगतोय कर्माची फळं; 14 मे नंतरचा काळ ठरणार सर्वात घातक
India-Pakistan War : पाकिस्तानची स्थिती सध्या वाईट असण्याचे कारण त्यांच्या कर्मांचे आणि त्यांच्या कुंडलीतील ग्रह- ताऱ्यांचे वाईट परिणाम आहेत.
India-Pakistan War
1/8

पहलगाम हल्ल्याच्या 15 दिवसांनंतर, भारताने 'ऑपरेशन सिंदूर' द्वारे पाकिस्तानी दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त केले.ज्योतिष शास्त्राच्या मते, पाकिस्तानच्या ग्रह-नक्षत्रांची स्थिती चांगली नाही. तसेच, पाकिस्तानचे येणारे दिवस आणखी गंभीर असू शकतात असंही सांगण्यात आलं आहे.
2/8

22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. ज्यामध्ये भारताचे 26 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई केली आणि सिंधू पाणी करार स्थगित केला. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आणि अटारी सीमेवर होणारा व्यापार थांबवला.
3/8

त्यानंतर,पाकिस्तानच्या समस्या एका मागून एक वाढू लागल्या. 6-7 मे च्या दरम्यान मध्यरात्री भारताने 'ऑपरेशन सिंदूर' द्वारे पाकिस्तानी दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त केले.
4/8

पाकिस्तानची स्थिती सध्या वाईट असण्याचे कारण त्यांच्या कर्मांचे आणि त्यांच्या कुंडलीतील ग्रह- ताऱ्यांचे वाईट परिणाम आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार, पाकिस्तानच्या कुंडलीच्या सातव्या घरात बसलेले चार ग्रह म्हणजेच, शनी, राहू, शुक्र आणि बुध या ग्रहांमुळे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
5/8

शनीला कर्मफळदाता आणि न्यायदेवता म्हणतात. शनी प्रत्येकाला आपल्या वाईट कर्मांचं फळ देतो. त्यांना शिक्षा देतो. अशा परिस्थितीत, येणारा काळ पाकिस्तानसाठी अस्थिरता, संकट आणि आंतरराष्ट्रीय दबाव आणू शकतो.
6/8

शनिदेव दुष्टांचा नाश करतात आणि त्यांच्या कर्माची त्यांना शिक्षा देतात. 7 मे रोजी पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. कुंभ लग्नाचा स्वामी देखील शनी महाराज आहे.
7/8

एवढेच नाही तर, 14 मे नंतर जेव्हा गुरु ग्रह मिथुन राशीत भ्रमण करेल, तेव्हा पाकिस्तानच्या कुंडलीत अंग-भंग नावाचा योग तयार होणार आहे. हा ग्रह पाकिस्तानसाठी विनाशकारी ठरेल आणि गंभीर संकट निर्माण करेल.
8/8

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 09 May 2025 11:51 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























