एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Eye Twitching : उजवा डोळा फडफडणं अशुभ की डावा डोळा? शास्त्र सांगते...
Eye Blinking Astrology : अनेकदा आपले डोळे काही सेकंदांसाठी फडफडतात. शास्त्रानुसार, डोळ्यांच्या फडफडण्याने शुभ किंवा अशुभ असे दोन्ही प्रकारचे संकेत मिळतात.
Eye Blinking astrology
1/10

वास्तुनुसार तुमचा कोणता डोळा फडफडतो, यावरुन अनेक गोष्टींचे संकेत मिळतात. शास्त्रानुसार, डोळ्यांच्या फडफडण्यामागे शुभ किंवा अशुभ कारणं असतात.
2/10

डोळे फडफडणं ही वैज्ञानिकदृष्ट्या फार सामान्य बाब झालीये. परंतु, धार्मिकतेनुसार आजही काही गोष्टींना फार मानलं जातं. यानुसार, कोणता डोळा फडफडणं चांगलं? जाणून घेऊया.
3/10

वास्तुशास्त्रानुसार पुरुषांसाठी उजव्या डोळ्याचं फडफडणं शुभ मानलं जातं. जर एखाद्या पुरुषाचा उजवा डोळा फडफडत असेल तर त्याला लवकरच चांगली बातमी मिळणार आहे, असं मानतात.
4/10

उजवा डोळा फडफडणं पुरुषांसाठी चांगलं असतं. अशा वेळी तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो, एखाद्या कामात यश मिळू शकतं किंवा चांगल्या मित्राला भेटण्याची संधी मिळू शकते.
5/10

पुरुषांचा डावा डोळा फडफडणं अशुभ समजलं जातं. डावा डोळा फडफडल्यास अशुभ घटना घडतील, असं मानतात. यामुळे वाद, कामात अडथळे, कुटुंबात कलह, अतिरिक्त खर्च होण्याची शक्यता असते.
6/10

स्त्रियांसाठी डाव्या डोळ्याचं फडफडणं शुभ असतं. जर एखादा स्त्रीचा डावा डोळा फडफडत असेल तर तिला चांगली बातमी मिळू शकते.
7/10

स्त्रियांसाठी डाव्या डोळ्याचं फडफडणं चांगलं आहे, या काळात तुमच्यासोबत चांगल्या घटना घडतात.
8/10

याउलट, उजवा डोळा फडफडणं हे स्त्रियांसाठी अशुभ मानलं जातं, या वेळी संकटाची चाहूल मिळत असते. तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
9/10

परंतु वैज्ञानिकदृष्ट्या पाहिल्यास, थकवा, तणाव, कॅफिन किंवा अल्कोहोलचं अतिप्रमाणात सेवन यामुळे डोळे फडफडतात. असं वारंवार होत असतील डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
10/10

वारंवार डोळे फडफडत असतील तर पुरेशी झोप घ्या आणि तणाव टाळा.
Published at : 16 Oct 2024 12:37 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
पुणे
व्यापार-उद्योग



















