Zero Hour : मेट्रोची कामं, अवजड वाहनं डोकेदुखी ठरतात? ठाणे महापालिकेचे मुद्दे काय?
Zero Hour : मेट्रोची कामं, अवजड वाहनं डोकेदुखी ठरतात? ठाणे महापालिकेचे मुद्दे काय?
मुंब्रा-कौसा परिसरातील महिलांनी पाण्यासाठी ठाणे मनपा आयुक्तांच्या दालनात धडक मोर्चा नेलाय...मुंब्रा - कौसाच्या वाट्याचे 17 लाख लिटर पाणी चोरले जात असल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून केला जातोय. मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलंय. मनपाच्या अधिकाऱ्यांना गुलाब देऊन आंदोलन करण्यात आलंय. दरम्यान पाणीप्रश्न निकाली लावला नाही तर गुलाबाच्या फुलांच्या जागी हंडे फेकून मारु असा इशारा आंदोलकांनी दिलाय
हे ही वाचा..
बीडमधील सरपंच हत्याप्रकरणावरुन राजकारण तापलं असून मंत्री धनंजय मुंडेंच्या (Dhananjay munde) राजीनाम्यासाठी राज्य सरकारवर दबाव वाढत आहे. त्यातच, धनजंय मुंडेंनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मात्र, या भेटीनंतर त्यांनी बीड प्रकरणावर बोलणे टाळले असून ही भेट केवळ नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी होती, असे त्यांनी म्हटले. दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बीडमधील हत्याप्रकरण व त्यांना येत असलेल्या धमक्यांसदर्भात माहिती दिली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधताना भेटीत काय चर्चा झाली याबाबत सांगितले. तसेच, बीडमधील घटनेसंदर्भाने 5 प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये, वाल्मिक कराड राहत असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी त्यांनी केली आहे.