एक्स्प्लोर
Dhanteras 2024 : धनत्रयोदशीला फक्त 10 रुपयांत खरेदी करा 'ही' वस्तू; झटक्यात नशीब पालटेल
Dhanteras 2024 : धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेराची पूजा केली जाते. तसेच, अनेक वस्तूंची देखील खरेदी करतात.
Dhanteras 2024
1/9

धनत्रयोदशीच्या दिवसापासूनच पाच दिवसांच्या दीपोत्सवाला म्हणजेच दिवाळीची सुरुवात होते. दिवाळीचा मुहूर्त म्हटला की सामानाची, वस्तूंची खरेदी करणं आलंच. मात्र, धनत्रयोदशीच्या दिवशी फक्त 10 रुपयांची वस्तू खरेदी करुन तुम्ही तुमचं भाग्य बदलू शकता.
2/9

यंदा दिवाळीच्या दोन दिवसांआधी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जाणार आहे. धनत्रयोदशी 29 ऑक्टोबर 2024 रोजी साजरी केली जाणार आहे.
3/9

धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेराची पूजा केली जाते. तसेच, अनेक वस्तूंची देखील खरेदी करतात. असं म्हणतात की, या दिवशी खरेदी केलेल्या वस्तूमुळे आपल्याला अनेक प्रकारचे फायदे मिळतात.
4/9

थोडक्यात सांगायचं तर, धनत्रयोदशीचा दिवस खरेदीसाठी शुभ मानला जातो. त्यामुळेच लोक या दिवशी सोनं-चांदीपासून पितळ्याच्या-तांब्याच्या वस्तू , नवीन घर, वाहन तसेच, इलेक्ट्रिक वस्तूंची खरेदी करतात.
5/9

मात्र, धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही फक्त 10 रुपयांची वस्तू खरेदी करुन देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवू शकता. कारण या वस्तूला फार शुभ मानण्यात आलं आहे.
6/9

धनत्रयोदशीच्या दिवशी धणे नक्की विकत घ्या. यासाठी तुम्ही 10 रुपयांचं धण्याचं पॅकेट खरेदी करुन देवघरात ठेवू शकता. दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीसह धणे ठेवून पूजा करा आणि पुढच्या दिवशी झाडाच्या कुंडीत घालून ठेवा.
7/9

मान्यतेनुसार, कुंडीत टाकलेल्या धण्यातून जर हिरवंगार कोथिंबीरचं रोप येत असेल तर यामुळे घरात संपन्नता येते. घराच्या आर्थिक स्थितीसाठी हे फार शुभ मानण्यात आलं आहे. यामुळे उत्पन्नाचे चांगले स्त्रोत उपलब्ध होतात.
8/9

मात्र, जर वनस्पती निर्जीव किंवा पातळ असेल तर ते सामान्य संपत्तीचे लक्षण मानले जाते. पण, जर धण्यातून कोथिंबीरचं रोप उगवत नसेल तर तुम्हाला आर्थिक संपत्तीचा सामना करावा लागू शकतो.
9/9

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 26 Oct 2024 10:00 AM (IST)
आणखी पाहा























