एक्स्प्लोर
फळ पीकविमा योजनेचा कालावधी वाढवला
केळी उत्पादक शेतकऱ्यांना योजनेत सहभाग घेण्यासाठी 3 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.
Pradhan Mantri Pik Vima Yojana
1/9

केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. तांत्रिक अडचणींमुळं काही केळी उत्पादक शेतकरी फळ पीकविमा योजनेत विहित वेळेत सहभागी होऊ शकले नव्हते. त्यांना सहभागी होता येणार आहे.
2/9

सहभागी होण्यासाठी 31 ऑक्टोबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, आता ही मुदत वाढवण्यात आली आहे.
3/9

केळी उत्पादक शेतकऱ्यांना योजनेत सहभाग घेण्यासाठी 3 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. याबाबतची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांनी दिली आहे.
4/9

फळ पीकविमा योजनेची मुदत वाढवून मिळावी यासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारला विनंती केली होती.
5/9

केंद्र सरकारनं याची दखल घेऊन केळी उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेत सहभाग होण्यासाठी 3 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ दिली असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.
6/9

प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत हवामान आधारित फळ पिक विमा योजनेमध्ये आंबिया बहार 2023-24 साठी केळी पिकाचा विमा योजनेत सहभागासाठी अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर 2023 हा होता.
7/9

31 ऑक्टोबर 2023 पर्यंत 45731 अर्जदारांनी केळीसाठी विमा योजनेत सहभाग घेतलेला आहे. तरी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी याची नोंद घेऊन विमा योजनेत आपला सहभाग वाढवावा असे आवाहन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे.
8/9

नैसर्गिक आपत्तीपासून पिकांना संरक्षण मिळावं म्हणून ही योजना
9/9

प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फळपीक विमा योजना राबविली जाते, ज्यामध्ये मृगबहार व आंबिया बहार अशा दोन ऋतूसाठी शेतकऱ्यांकडून पिकविमा भरून घेतला जातो.
Published at : 02 Nov 2023 07:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
विश्व
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion