Zomato चे CEO स्वतः बनले डिलिव्हरी बॉय, Friendship Day ला ग्राहकांना दिले सरप्राईज
Zomato च्या CEO दीपंदर गोयल यांनी अतिशय अनोख्या पद्धतीने फ्रेंडशिप डे साजरा केला आहे. त्यांनी ट्विटरवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.
Zomato : झोमॅटो कंपनीचे सीईओ दीपंदर गोयल यांनी अतिशय अनोख्या पद्धतीने फ्रेंडशिप डे (Friendship Day) साजरा केला. फ्रेंडशिप डेला गोयल यांनी डिलिव्हरी बॉयचे कपडे घालून डिलिव्हरी केली. याबाबत त्यांनी ट्विटरवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी Zomato डिलिव्हरी बाॅयचे कपडे घातले आहेत आणि यात ते रॉयल एनफिल्ड बाईकवर बसलेले दिसत आहेत. तसेच त्यांनी Zomato ची बॅग देखील गाडीला मागे लावली आहे.
खरंतर, झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांनी स्वत: पार्सलची डिलिव्हरी करुन ग्राहकांना आश्चर्याचा धक्का दिला आणि फ्रेंडशिप बँड देखील वाटले. गोयल यांनी अनेक फ्रेंडशिप बँड हातात घेतल्याचे पोस्टमध्ये दिसत आहे. त्यांचे हा अनोखा उपक्रम पाहून सोशल मीडियावर लोक खूप प्रभावित झाले. लोक कमेंट करुन त्याचे कौतुक करत आहेत.
झोमॅटोचे सीईओ गोयल यांनी ट्वीट केले की, "माझे डिलिव्हरी पार्टनर, रेस्टॉरंट पार्टनर आणि ग्राहकांना मी काही खाद्यपदार्थ आणि फ्रेंडशिप बँड देणार आहे. आतापर्यंतचा हा सर्वात चांगला रविवार आहे."
Going to deliver some food and friendship bands to our delivery partners, restaurant partners and customers. Best Sunday ever!! pic.twitter.com/WzRgsxKeMX
— Deepinder Goyal (@deepigoyal) August 6, 2023
2023 च्या पहिल्या तिमाहीत Zomato ला नफा
Zomato सध्या प्रचंड प्रसिद्धीच्या झोतात आहे. कंपनीने गुरुवारी आर्थिक वर्ष 2023 चा पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर केला. Zomato ने प्रथमच मोठ्या प्रमाणात नफा नोंदवला आहे. कंपनीचा नफा 2 कोटी रुपये आहे, तर वर्षभरापूर्वी याच तिमाहीत कंपनीला 186 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. कंपनीने फूड ऑर्डर डिलिव्हरीवर चार्ज घेणे सुरु केले आहे. Zomato प्रत्येक ऑर्डरवर 2 रुपये प्लॅटफॉर्म शुल्क आकारत आहे. जरी सध्या ते निवडक वापरकर्त्यांकडून घेतले जात आहे. येत्या काळात हे शुल्क सर्व वापरकर्त्यांना लागू होऊ शकते. जर कंपनीचे हे पाऊल यशस्वी झाले तर तिला भरपूर नफा कमावण्याचा फायदा मिळेल. एका अहवालानुसार झोमॅटोला दररोज 2 दशलक्ष ऑर्डर्स मिळतात. यानुसार कंपनीने 2 रुपये चार्ज घेतल्यास दररोज 40 लाख रुपयांचा नफा होईल. अशा प्रकारे, कंपनी दरमहा सुमारे 12 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकते.
तर 2022 वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबर रोजी सीईओ दीपंदर गोयल यांनी स्वत: डिलिव्हरी बॉय बनून ग्राहकांच्या ऑर्डर त्यांच्या घरी पोहोचवल्या आहेत. गोयल यांनी स्वत: च्या ट्विटरवरुन याबाबतची ही माहिती दिली होती.
देशभरात फ्रेंडशिप डे साजरा
भारतात फ्रेंडशिप डे ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. त्यामुळेच यंदा तो 6 ऑगस्ट, रविवारी साजरा होत आहे. भारताव्यतिरिक्त काही इतर देश देखील या दिवशी फ्रेंडशिप डे साजरा करतात, ज्यात बांगलादेश, यूएई, मलेशिया आणि अमेरिका यांचा समावेश आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Poet Gaddar Death: तेलंगणातील प्रसिद्ध गायक गदर यांचं निधन; वयाच्या 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास