Yavatmal News: लग्नासाठी सामान आणण्यासाठी गेलेल्या पाहुण्यांवर काळाचा घाला, कुटुंबियांचा रस्त्यावर टाहो... परिसरात हळहळ
Yavatmal Accident: यवतमाळमध्ये झालेला हा अपघात इतका भीषण होता की, यात मृतदेहाचा चेंदामेंदा झाला. अपघाताची माहिती मिळताच तरुणाचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले.
Yavatmal Accident News : यवतमाळच्या वणीतील चिखलगाव जवळील लालपुलियाजवळ भीषण अपघात झाला आहे. दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले आणि दोघेही ट्रकच्या मागील चाकात येऊन चिरडले गेले. या अपघातात दुचाकीस्वार व मागे बसलेला प्रवासी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.
यवतमाळमध्ये झालेला हा अपघात इतका भीषण होता की, यात मृतदेहाचा चेंदामेंदा झाला. अपघाताची माहिती मिळताच तरुणाचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. संतप्त नातेवाईकांनी ट्रकच्या काचा फोडल्या. त्यामुळे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण होते. महादेव कांबळे हे मेघदूत कॉलनी चिखलगाव येथील रहिवासी आहे. त्यांच्या घरी गुरुवारी लग्नकार्य होते. त्यानिमित्त त्यांच्या घरी पाहुणे आले होते. आज शुक्रवारी दिनांक 12 मे रोजी सकाळच्या सुमारास त्यांच्या घरातील दोन पाहुणे हे दुचाकीवर (Mh 29 AH 8391) प्लेट, कप व इतर साहित्य आणण्यासाठी वणीला गेले होते. सामान परत घेऊन ते मेघदूत कॉलनीत परत जात होते. 9 वाजताच्या सुमारास देशप्रेमी हॉटेल जवळ एक ट्रक (MH34 BG 1983) जात होता. या ट्रकला ओव्हटेक करताना भरधाव ट्रकचा धक्का दुचाकीला लागला. दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीस्वाराचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व दोघेही ट्रकच्या मागच्या चाकात आले.
अपघातात दोघांच्याही छातीपासून वरच्या भागाचा चेंदामेंदा झाला. घटनास्थळावर काही वेळ दोन्ही मृतदेह पडलेले होते.बराच वेळ झाल्याने दोन्ही पाहुणे घरी न आल्याने एकाने त्यांना फोन केला असता दोघांचाही अपघात झाल्याची माहिती कांबळे कुटुंबियांना मिळाली. कांबळे कुटुंबीय तात्काळ घटनास्थी पोहोचले. घटनास्थळी संतप्त नातेवाईकांनी ट्रकच्या काचांची तोडफोड केली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. संतप्त नागरिकांनी काही काळ चक्का जाम केला होता.
अपघातानंतर जमाव संतप्त
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. यावेळी जमलेली गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आली. लालपुलिया जवळ परिसरात अपघात संतप्त नागरिकांनी ट्रकच्या काचांची तोडफोड केली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्यानंतर जमाव पांगल्याने रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली.
अपघाताच्या प्रमाणात वाढ
यवतमाळ जिल्ह्यात अपघाताच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. रोज अपघाताच्या घटना समोर येत आहेत. त्यात अनेकांचे नाहक जीव जात आहेत. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्व पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र अपघाताच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :