Yavatmal Crime News : तुझ्या मावशीसोबत मज्जा केली, वादावादीत नराधम बोलून गेला, गतिमंद तरुणीवर 5 जणांच्या अत्याचाराचं बिंग फुटलं!
Yavatmal Crime News : यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात एका गतिमंद तरुणीच्या असह्यतेचा फायदा घेऊन पाच जणांनी तिच्यावर बळजबरीने अत्याचार (Yavatmal Crime News) केलाय.

Yavatmal Crime News : यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातून एक अतिशय खळबळजनक आणि तितकीच संतापजनक बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये एका गतिमंद तरुणीच्या असह्यतेचा फायदा घेऊन पाच जणांनी तिच्यावर बळजबरीने अत्याचार (Yavatmal Crime News) केलाय. ही गंभीर घटना दारव्हा तालुक्यातील एका गावात उघडकीस आली. घटनेची तक्रार दाखल होताच पोलिसांनी तीन जणांना तत्काळ अटक केली. तर घटनेतील एक आरोपी अल्पवयीन (Crime News) असून पाचव्या आरोपीचा शोध सध्या सुरू आहे. घटनेनंतर गतिमंद तरुणीच्या बहिणीने दारव्हा पोलिसात याप्रकरणी तक्रार दिली. घटनेचं गांभीर्य लक्ष्यात घेता पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे, मात्र या घटनेने सर्वत्र एकाच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड रोष बघायला मिळत आहे.
तुझ्या मावशीसोबत मज्जा केली, वादावादीत नराधम बोलून गेला..
पुढे आलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी हि घरी परत येत असताना रात्रीच्या सुमारास आरोपींनी तीला ले-आऊटमध्ये नेऊन तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या घटनेची पुसटशी कल्पना देखील पीडितेच्या कुटुंबीयांना नव्हती. अशातच तक्रारदारांचा मुलगा आणि आरोपी यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादात आरोपीने पीडितेच्या मावशीसोबत 'मजा केल्याचे' उद्गार काढले. त्यानंतर ही संतापजनक घटना उघडकीस आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिली. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
यवतमाळच्या पाटणबोरीत 31 जुगारींना अटक, धाडीत 45 लाखांचा मुद्देमाल जप्त
राष्ट्रीय महामार्गावरील यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथील एका जुगार अड्ड्यावर धाड टाकून पांढरकवडा पोलिसांनी एक लाख 56 हजार 760 रुपये रोख 36 लाख रुपये किंमतीच्या तीन कार, तीस मोबाईल, 95 खुर्च्या व इतर सामग्रीसह तब्बल 44 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. शकूर पाशा अंकुर अहमद, हनम कोंडा तेलंगणा यांच्यासह तब्बल 31 जुगार यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध कलम चार पाच महाराष्ट्र जुगार कायदा सह विविध कलमन्वे गुन्हा दाखल केला.
जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यातून चंदनाच्या झाडाची चोरी
हिंगोली जिल्ह्यात नेमकं चाललय तरी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण सातत्याने चोरीच्या घटना हिंगोली जिल्ह्यांमध्ये वाढत असताना आज चक्क हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याच बंगल्यातील चंदनाच्या झाडाची चोरी झालीय. चंदन तस्करांनी हि चोरी केल्याचं उघडकीस आलं आहे. हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या साईनगर भागातील शासकीय निवासस्थानी एक चंदनाचे झाड होते, हे झाड रात्रीच्या सुमारास चंदन तस्करांनी कापून या झाडाचे खोड ज्याची किंमत हजारोंच्या घरामध्ये असते ते कापून नेले आहे. त्यामुळे हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या बंगल्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोबतच या चोरीच्या माध्यमातून चोरट्यांनी चक्क पोलिसांनाच आव्हान दिलं आहे.
हे ही वाचा -























