World's Tallest Ganesh Statue : जगातील सर्वात उंच 128 फूट उंच श्री गणेशाची मूर्ती, भारतात नाही 'या' देशात आहे; वाचा सविस्तर...
World's Tallest Ganesh Idol : गणपती बाप्पाची जगातील सर्वात उंच मूर्ती (World's Tallest Ganesh Statue) भारतात नाही तर दुसऱ्या देशात आहे. ही भव्य मूर्ती सुमारे 128 फूट उंचीची आहे. हा देश कोणता जाणून घ्या.
मुंबई : सर्वत्र गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2023) उत्साह पाहायला मिळत आहे. श्री गणेशाचे भक्त फक्त भारतातच नाही तर, जगभरात आहे. जगभरात गणेशोत्सव (Ganesh Chaturthi 2023) मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. भारताप्रमाणे (India) इतर देशांमध्येही श्री गणेशाची आराधना केली जाते. अनेक देशांमध्ये श्री गणेशाच्या मूर्तीही पाहायला मिळतात. तुम्हाला ऐकून नवल वाटेल पण, श्री गणेशाची जगातील सर्वात उंच मूर्ती (World's Tallest Ganesh Statue) भारतात नाही तर दुसऱ्या देशात आहे. ही भव्य मूर्ती सुमारे 128 फूट उंचीची आहे. हा देश कोणता जाणून घ्या.
जगातील सर्वात उंच गणेशाची मूर्ती
भारतात हिंदू धर्मानुसार, गणपतीला आराध्य दैवत मानले जाते आणि त्याची मनोभावे पूजा केली जाते. भारताप्रमाणे इतर देशांमध्येही गणपतीबाबत श्रद्धा आहे. असाच एक देश म्हणजे थायलंड. थायलंडमधील बहुतेक लोक श्री गणेशाची पूजा करतात. येथे ठिकठिकाणी गणपतीची मंदिरे आणि मूर्ती तुम्हाला दिसून येतील. महत्त्वाचं म्हणजे जगातील सर्वात उंच श्री गणेशाची मूर्ती भारतात नाही तर, थायलंडमध्ये आहे. येथील नागरिकांची गणपती बाप्पावर खूप श्रद्धा आहे.
या देशात आहे 128 फूट उंच गणपतीची मूर्ती
थायलंडच्या ख्लोंग ख्वांग (Khlong Khwang) जिल्ह्यात जगातील सर्वात उंच गणेशाची मूर्ती आहे. या ठिकाणी गणेश इंटरनॅशनल पार्क (Ganesh International Park) तयार करण्यात आले असून त्यामध्ये ही 39 मीटर उंच गणपतीची मूर्ती बसवण्यात आली आहे. श्री गणेशाची ही भव्य मूर्ती कांस्य धातूपासून तयार करण्यात आली आहे. ही गणेशाची मूर्ती 2012 मध्ये बसवण्यात आली. 2012 साली गणेश इंटरनॅशनल पार्क तयार करण्यात आलं आणि त्यात 39 मीटर उंच कांस्य मूर्ती बसवण्यात आली आहे.
थायलंडमधील ही भव्य गणेशाची मूर्ती 39 मीटर म्हणजे सुमारे 128 फूट उंच आहे. या भव्य मूर्तीची उंची 14 मजल्यांच्या उमारतीच्या बरोबर आहे. 2008 मध्ये ही मूर्ती बनवण्याचं काम सुरु झालं आणि 2012 साली ही भव्य मूर्ती तयार झाली. ही गणेशाची मूर्ती उभ्या मुद्रेत आहे. मूर्तीला चार हात आहे. ख्लोंग ख्वांग जिल्ह्यातील चाचोएंगसाओ शहरात 40000 वर्गमीटरमध्ये हे गणेश इंटरनॅशनल पार्क उभारण्यात आलं आहे.
थायलंडमध्ये गणपतीची 'या' नावाने पूजा
थायलंडमध्ये गणपतीला 'फिकानेत' या नावानं ओळखलं जातं. येथे 'फिकानेत' सर्व अडथळ्यांचा नाश करणारा आणि यश मिळवून देणारा देव मानला जातो. नवीन व्यवसाय आणि लग्न किंवा इतर महत्त्वाच्या कार्याआधी येथे गणपतीची पूजा केली जाते. गणेश चतुर्थी सोबतच गणेशाची जयंतीही थायलंडमध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
विविध देशांमध्ये श्री गणेशाची विविध नावे आणि रूपे
अफगाणिस्तान, इराण, म्यानमार, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, चीन, मंगोलिया, जपान, इंडोनेशिया, ब्रुनेई, बल्गेरिया, मेक्सिको आणि लॅटिन अमेरिकन देशांमध्ये गणेशाच्या मूर्ती दिसून येतात. वेगवेगळ्या देशांमध्ये गणपतीची वेगवेगळ्या नावांनी पूजा केली जाते. जपान, श्रीलंका, थायलंड या देशांमधील लोकही गणेशाची मनोभावे पूजा करतात. श्री गणेशाला थायलंडमध्ये 'फिकानेत' आणि जपानमध्ये 'कांगितेन', तर श्रीलंकेत 'पिल्लयार या नावाने ओळखलं जातं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :