(Source: Poll of Polls)
World's Oldest Person Death : जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचं निधन; ल्यूसिल रँडन यांचा मृत्यू, 118 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Lucile Randon : ल्यूसिल रँडन यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1904 रोजी झाला होता. त्यांचं 119 व्या वर्षी निधन झालं आहे.
World's Oldest Person Dies : जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती (World's Oldest Person) आणि फ्रान्सी नन ल्यूसिल रँडन (Lucile Randon) यांचा मृत्यू झाला आहे. ल्यूसिल रँडन यांनी वयाच्या 118 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ल्यूसिल रँडन यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1904 रोजी दक्षिण फ्रान्समध्ये (France) झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती ल्यूसिल रँडन या 118 वर्षांच्या होत्या, त्यांचं 118 व्या वर्षी निधन झालं आहे. प्रवक्ता डेविड तावेल्ला यांनी ही माहिती दिली आहे. रँडन यांचं झोपेत वृद्धापकाळाने निधन झालं आहे.
जगातील सर्वात वृद्ध महिलेचं निधन
ल्यूसिल रँडन या फ्रान्सच्या दक्षिणेकडील शहर एल्स येथे वास्तव्यास होत्या. त्यांना सिस्टर अँड्र्यू (Sister Andre) नावाने देखील ओळखलं जातं. प्रोटेस्टंटवादी कुटुंबात त्यांच्या जन्म झाला आणि त्यांचं बालपण गेलं. रँडन तीन भावांची एकुलती एक लाडकी बहिण होती. प्रवक्ता डेविड तावेल्ला यांनी सांगितले की, रँडन यांच्या भावाचा आधीच मृत्यू झाला होता. ल्यूसिल यांना त्यांच्या भावांकडे म्हणजे देवाच्या दारी जायचे होते. त्यामुळे ल्यूसिल यांचा मृत्यू त्यांच्यासाठी मुक्ती मिळण्यासारखं आहे.
2021 मध्ये कोरोना संसर्गापासून बचावल्या
रँडन 2021 मध्ये कोविड-19 संसर्गापासून बचावल्या होत्या. रँडन यांच्या नर्सिंग होममधील 81 लोकांना कोरोना संसर्ग झाला होता. पण रँडन यांना कोरोनाची बाधा झाली नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, त्या अंध होत्या आणि व्हीलचेअरवर होत्या. असे असले तरीही रँडन त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या इतर वृद्धांची काळजी घेत असत.
सर्वात वृद्ध महिलेचं वयाच्या 119 व्या वर्षी निधन
याआधी एप्रिल 2022 मध्ये जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती जपानचे केन तनाका (Kane Tanaka) या महिलेचे निधन झाले होते. वयाच्या 119 व्या वर्षी केन यांनी अखेरचा श्वास घेतला. केन यांचा जन्म 2 जानेवारी 1903 रोजी जपानच्या नैऋत्येकडील फुकुओका येथे झाला होता. केन यांचे नाव 2019 मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले. तेव्हा तनाका 116 वर्षांच्या होत्या. 1922 मध्ये केन यांचे हिदेओ तनाका यांच्याशी लग्न झाले होते. त्यांनी चार मुलांना जन्म दिला आणि पाचवे मुलं दत्तक घेतले होते.
केन यांनी तरुणपणात अनेक व्यवसाय चालवले. त्यांनी राईस केक शॉपही चालवले. तनाका यांनी व्हीलचेअरवरुन 2021 मध्ये टोकियो ऑलिम्पिकसाठी टॉर्च रिलेमध्ये सहभागी होण्यासाठी योजना आखली होती, परंतु कोरोनामुळे त्याची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. जपानमध्ये जगातील सर्वाधिक वृद्ध लोकसंख्या आहे. जपानमधील सुमारे 28 टक्के लोक 65 किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत. गिनीजमधील सर्वात वृद्ध व्यक्ती जीन लुईस कॅलमेंट ही फ्रेंच महिला होती. जीन यांचे 1997 मध्ये वयाच्या 122 वर्षे आणि 164 दिवसांनी त्यांचे निधन झाले होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या