Drought : गेल्या 50 वर्षाच्या काळात दुष्काळामुळे सात लाख लोकांचा मृत्यू, WMO ची माहिती
गेल्या 50 वर्षात दुष्काळामुळे जगभरातील सात लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागलाय अशी माहिती जागतिक हवामानशास्त्र संघटनेनं (WMO) दिली आहे.
WMO : दुष्काळ हे एक असं कारण आहे की ज्यामुळे जगभरातल्या लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागतोय, लाखो लोकांना विस्थापित व्हावं लागतंय. याचं चक्र सातत्याने सुरुच असते. गेल्या 42 वर्षाच्या काळात, म्हणजे 1970 ते 2012 या काळात जगभरातल्या 6 लाख 80 हजार लोकांचा तर गेल्या 50 वर्षात सात लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती जागतिक हवामानशास्त्र संघटनेनं (World Meteorological Organization) दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने आफ्रिका खंडातील लोकांचा समावेश आहे.
दुष्काळ हा एक दीर्घकालीन कोरडा काळ असतो. नैसर्गिक हवामान चक्रानुसार तो जगभरात अनेक ठिकाणी उद्भवतो. दुष्काळ म्हणजे पावसाची कमतरता. त्याचा परिणाम म्हणजे त्या प्रदेशात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होतो, गरीबी, उपासमारी या अशा अनेक गोष्टी घडत राहतात. जमिनीचा चुकीच्या पद्धतीने वापर, पाण्याचे अयोग्य नियोजन, हवामान अशा अनेक कारणांमुळे त्या परिसराला दुष्काळाला सामोरं जावं लागतं. दुष्काळामुळे पाणी आणि अन्नधान्यांचा तुटवडा पडतो आणि त्याचा परिणाम लोकसंख्येच्या आरोग्यावर होतो. रोगराई आणि मृत्यूचे परिणाम मोठ्या प्रमाणात वाढते.
जागतिक हवामानशास्त्र संघटनेने (WMO) असं सांगितलंय की, 1970 ते 2012 या काळात दुष्काळामुळे जगभरात 6 लाख 80 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आफ्रिका खंडातील 1975, 1983 आणि 1984 साली आलेल्या तीव्र दुष्काळांचा समावेश आहे.
#Drought is a major killer
— World Meteorological Organization (@WMO) October 6, 2021
In the last 50 years, it has claimed the lives of more than 700,000 people
Integrated proactive drought policies could ⬇️ deaths and economic losses
Read more about our action with @GWPnews https://t.co/L4voGHZwak pic.twitter.com/yDyc3TgA0b
जगभरातील दुष्काळाचे निवारण करण्यासाठी जागतिक हवामानशास्त्र संघटना (WMO) आणि ग्लोबल वॉटर पार्टनरशीप (Global Water Partnership) या संघटनांनी एकत्र येऊन एकात्मिक दुष्काळ व्यवस्थापन कार्यक्रम (IDMP) सुरु केला आहे.
IDMP या कार्यक्रमामध्ये जगभरातील अनेक संस्था सहयोग देतात. दुष्काळ निवारण व्यवस्थापन आणि त्या संबंधीच्या जगभरातली चांगल्या प्रॅक्टिसेसची माहिती देणे तसेच जगभरातील विविध संस्थांमध्ये समन्वय साधण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलं जातं. ग्लोबल फ्रेमवर्क ऑफ क्लायमेट सर्व्हिसेस हा कार्यक्रम दुष्काळाची तीव्रता कमी करणे, पाण्याचं संवर्धन करणे, कृषी संवर्धन आणि अन्न सुरक्षा यासंबंधी काम करते. या कार्यक्रमामध्ये IDMP चे महत्वपूर्ण योगदान आहे. यासाठी जगभरातील विविध देश, संस्था आपले सरकार्य देतात.
महत्वाच्या बातम्या :