एक्स्प्लोर

World Hepatitis Day 2021 : दरवर्षी लाखो लोकांचा बळी घेणारा हिपॅटायटिस रोग काय आहे? जाणून घ्या सर्वकाही

World Hepatitis Day 2021 : आज जागतिक हिपॅटायटिस दिवस साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने या रोगाबद्दल जगभर जागरुकता निर्माण करण्याचा उद्देश आहे. 

World Hepatitis Day 2021 : जगातील अनेक लोकांना आपल्याला नेमकं काय होतंय हेच समजत नाही आणि ज्यावेळी हे समजतं त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. हिपॅटायटिस हा असाच एक संसर्गजन्य रोग आहे. अनेकांना याची लागण झालेली समजत नाही. त्यामुळे जगभरातल्या लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागतो. या रोगाबद्दल सामान्य लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 28 जुलै हा दिवस जागतिक हिपॅटायटिस दिवस म्हणून साजरा करण्यात येतोय. 

हिपॅटायटिस हा एक संसर्गजन्य रोग असून त्यामुळे यकृताला सूज येते, जळजळ निर्माण होते. हिपॅटायटिसचे ए, बी, सी, डी आणि ई असे पाच प्रकार आहेत. हा संसर्गजन्य रोग जरी असला तरी अनेकवेळा अल्कोहोलचे अतिरिक्त सेवन, टॉक्सिन, अनावश्यक औषधांचा अतिरिक्त डोस अशा इतर कारणांमुळेही याची लागण होते. हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस ई या रोगाची लागण दूषित पाणी आणि दूषित अन्नामुळे होते. हिपॅटायटिस बी, सी आणि डी ची लागण संक्रमित रक्त आणि संसर्गातून होते. त्याचसोबत आईकडून मुलाला या रोगाचे संक्रमण होऊ शकते, तसेच असुरक्षित शारीरिक संबंध, असुरक्षित सुयांच्या वापरामुळेही या रोगाचे संक्रमण होऊ शकते. ज्या लोकांना हिपॅटायटिस बी ची लागण झाली आहे त्या लोकांना हिपॅटायटिस डी चीही लागण होते. 

दररोज तीन हजारांहून जास्त जीव जातात
जागतिक आरोग्य संघटनेच्या एका आकडेवारीनुसार, हिपॅटायटिस बी मुळे 2020 साली जगभरातील जवळपास चार कोटी लोक संक्रमित झाले होते तर जवळपास 1.2 कोटी लोक हे हिपॅटायटिस सी मुळे संक्रमित झाले होते. हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस सी मुळे दररोज तीन हजारांहून लोकांना आपला जीव गमवावा लागतोय असं जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगते. याचा अर्थ दरवर्षी 11 लाख लोकांना केवळ हिपॅटायटिस या आजारामुळे मृत्यूमुखी पडावं लागतंय. भारताचा विचार करता दरवर्षी किमान अडीच लाख लोकांना हिपॅटायटिस मुळे आपला जीव गमवावा लागतो. 

 

जागतिक हिपॅटायटिसचा दिवसाचा इतिहास
नोबेल पुरस्कार विजेते डॉ. बारुक एस ब्लुमबर्ग यांच्या सन्मानार्थ जागतिक हिपॅटायटिस दिवस साजरा केला जातो. 28 जुलै 1925 साली जन्मलेल्या या वैज्ञानिकाने  हिपॅटायटिस बी चा शोध आणि त्यावरील औषधाचाही शोध लावला होता. 2010 साली पार पडलेल्या 63 व्या जागतिक आरोग्य परिषदेमध्ये जागतिक हिपॅटायटिस दिवस साजरा करण्यास मंजुरी देण्यात आली. 

जागतिक हिपॅटायटिसचा दिवसाची थीम
या वर्षीच्या जागतिक हिपॅटायटिसची थीम ही 'Hepatitis Can't Wait'अशी आहे. जागतिक स्तरावर 2030 सालापर्यंत हिपॅटायटिसचे निर्मूलन करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravichandran Ashwin on Hindi : अश्विन अण्णा रिटायर्ड होताच हिंदी भाषेवर बोलला; काश्मीर ते कन्याकुमारी चर्चा रंगली, सोशल मीडियावर वादाला तोंड!
Video : अश्विन अण्णा रिटायर्ड होताच हिंदी भाषेवर बोलला; काश्मीर ते कन्याकुमारी चर्चा रंगली, सोशल मीडियावरही वादाला तोंड!
एकाच कुटुंबातील 5 जणांची गळा चिरून हत्या; पती-पत्नीचा मृतदेह चादरीमध्ये, 3 मुली बेड बाॅक्समध्ये सापडल्या
एकाच कुटुंबातील 5 जणांची गळा चिरून हत्या; पती-पत्नीचा मृतदेह चादरीमध्ये, 3 मुली बेड बाॅक्समध्ये सापडल्या
Sanjay Raut : विधानसभेच्या पराभवानंतर मविआत खटके उडायला सुरुवात, संजय राऊत म्हणाले, चुकीच्या पद्धतीने...
विधानसभेच्या पराभवानंतर मविआत खटके उडायला सुरुवात, संजय राऊत म्हणाले, चुकीच्या पद्धतीने...
Chandrapur : मुख्यमंत्र्यांच्या चंद्रपूर दौऱ्यात राजकीय नाराजीनाट्य; विजय वडेट्टीवारांना मानाचे पान;सुधीर मुनगंटीवार नाराज?
मुख्यमंत्र्यांच्या चंद्रपूर दौऱ्यात राजकीय नाराजीनाट्य; विजय वडेट्टीवारांना मानाचे पान;सुधीर मुनगंटीवार नाराज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalnaगुन्हेगाराला शिक्षा व्हावी ही अपेक्षा Dhananjay Deshmukh;जनआक्रोश मोर्चासाठी देशमुख कुटुंब दाखलMumbai Torres Fraud : 6 महिन्यांपूर्वीच तक्रार करुन देखील 'टोरेस'वर कारवाई का नाही याची चौकशी करणारNitin Raut : काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक बदल होतील : नितीन राऊतSharad Pawar NCP : आगामी निवडणुकीत 50 टक्के जागा महिलांना देणार : शरद पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravichandran Ashwin on Hindi : अश्विन अण्णा रिटायर्ड होताच हिंदी भाषेवर बोलला; काश्मीर ते कन्याकुमारी चर्चा रंगली, सोशल मीडियावर वादाला तोंड!
Video : अश्विन अण्णा रिटायर्ड होताच हिंदी भाषेवर बोलला; काश्मीर ते कन्याकुमारी चर्चा रंगली, सोशल मीडियावरही वादाला तोंड!
एकाच कुटुंबातील 5 जणांची गळा चिरून हत्या; पती-पत्नीचा मृतदेह चादरीमध्ये, 3 मुली बेड बाॅक्समध्ये सापडल्या
एकाच कुटुंबातील 5 जणांची गळा चिरून हत्या; पती-पत्नीचा मृतदेह चादरीमध्ये, 3 मुली बेड बाॅक्समध्ये सापडल्या
Sanjay Raut : विधानसभेच्या पराभवानंतर मविआत खटके उडायला सुरुवात, संजय राऊत म्हणाले, चुकीच्या पद्धतीने...
विधानसभेच्या पराभवानंतर मविआत खटके उडायला सुरुवात, संजय राऊत म्हणाले, चुकीच्या पद्धतीने...
Chandrapur : मुख्यमंत्र्यांच्या चंद्रपूर दौऱ्यात राजकीय नाराजीनाट्य; विजय वडेट्टीवारांना मानाचे पान;सुधीर मुनगंटीवार नाराज?
मुख्यमंत्र्यांच्या चंद्रपूर दौऱ्यात राजकीय नाराजीनाट्य; विजय वडेट्टीवारांना मानाचे पान;सुधीर मुनगंटीवार नाराज?
Cidco Homes : सिडकोच्या 26000 घरांसाठी पसंतीक्रम कधीपासून नोंदवायचा? बुकिंग शुल्क कधी भरायचं? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेबाबत मोठी अपडेट, पसंतीक्रम कधीपासून नोंदवता येणार? जाणून घ्या
Vijay Wadettiwar: अमोल कोल्हेंचा मित्रपक्षांना टोला, काँग्रेसवर परभवाचे खापर; विजय वडेट्टीवारांचे एका शब्दात प्रत्युत्तर, म्हणाले..
अमोल कोल्हेंचा मित्रपक्षांना टोला, काँग्रेसवर परभवाचे खापर; विजय वडेट्टीवारांचे एका शब्दात प्रत्युत्तर, म्हणाले..
Pune Crime: मला शुभदाला ठार मारायचं नव्हतं; पुण्याच्या आयटी कंपनीतील तरुण पोलीस चौकशीत काय म्हणाला?
पुण्याच्या आयटी कंपनीत काम करणाऱ्या शुभदा कोदारेची चाकूचे वार करुन हत्या, आता मारेकरी म्हणतो...
Devendra Fadnavis : 2019 वर्ष आलंच नसतं तर...; CM फडणवीसांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या, म्हणाले, 'महाराष्ट्राला कुणी...'
2019 वर्ष आलंच नसतं तर...; CM फडणवीसांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या, म्हणाले, 'महाराष्ट्राला कुणी...'
Embed widget