एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

World First SMS Merry Christmas Auctioned : जगातल्या पहिल्या टेक्स्ट मेसेजचा लिलाव; किंमत ऐकाल तर व्हाल अवाक्

World First SMS Merry Christmas Auctioned : जगातील पहिल्या टेक्स्ट मेसेजचा लिलाव झाला असून तब्बल 1 कोटी रुपयांना विकण्यात आला आहे.

World First SMS Merry Christmas Auctioned : पॅरिसमध्ये मंगळवारी एक लिलाव पार पडला. या लिलावानं अनेकांना थक्क केलं. हा लिलाव एखादी वस्तू, बंगला किंवा कोणत्याही गाडीचा नव्हता, तर हा लिलाव होता जगातील पहिल्या एसएमएसचा. हा  टेक्स्ट मेजेस तब्बल एक लाख 21 हजार डॉलर्सना विकण्यात आला. याची किंमत भारतीय चलनात पाहायची झाली, तर हा मेसेज लिलावात तब्बल 1 कोटी रुपयांना विकण्यात आला. 

आजपासून जवळपास 30 वर्षांपूर्वी कम्युनिकेशन जगतात एक नवा प्रयोग करत वोडाफोनचे इंजिनियर नील पैपवर्थ यांनी आपले सहयोगी रिचर्ड जार्विस यांना एक टेक्स्ट मेसेज पाठवला होता. हा एसएमएस पहिल्यांदा 3 डिसेंबर 1992 मध्ये पाठवण्यात आला होता. नील पैपवर्थ यांनी या एसएमएसला आपल्या कंप्युटरमधून युनायटेड किंग्डममधील आपल्या सहकाऱ्याला पाठवला होता. हा मेसेज त्यांच्या सहकाऱ्याला "Orbitel 901" या हँडसेटवर मिळाला होता. लिलावाचं आयोजन Aguttes ऑक्शन हाऊसच्या वतीनं करण्यात आलं होतं. 

जगातला पहिला टेक्स्ट मेसेज हा व्होडाफोन कंपनीच्या माध्यमातून करण्यात आला होता. व्होडाफोनच्या कर्मचाऱ्याने 3 डिसेंबर 1992 रोजी हा टेक्स्ट मेसेज केला असून तो 'मेरी ख्रिस्मस' (Merry Christmas) असा होता. या मेसेजमध्ये 14 अक्षरे होती. नील पापवर्थ या कर्मचाऱ्याने न्यूबेरी बर्कशायरमधील रिचर्ड जार्व्हिसला हा पहिला मेसेज केला होता. व्होडाफोन कंपनीकडून शॉर्ट मेसेज सर्व्हिस म्हणजे एसएमएस सेवावर काम सुरु होतं. त्याचाच एक भाग म्हणून हा प्रयोग करण्यात आला होता. त्याच्याच पुढच्या वर्षी नोकीया कंपनीने एसएमएस फीचरची सुविधा उपलब्ध करुन दिली आणि त्यानंतरचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. 

आता या मेसेजचा लिलाव काल (मंगळवारी) म्हणजेच, 21 डिसेंबरला फ्रान्समधील ऑगटर्स ऑक्शन हाऊस या ठिकाणी पार पडला. यातून जे काही पैसे मिळतील ते संयुक्त राष्ट्राच्या युनायटेड नेशन्स रिफ्युजी एजन्सी  (United Nations Refugee Agency- UNRA)ला देण्यात येणार आहेत. या मेसेजला लिलावासाठी 1 कोटी 71 लाख रुपयांची किमान मर्यादा ठेवण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक बोली लावणाऱ्या व्यक्तीला या मेसेजच्या सेंडर आणि रिसिव्हरची एक डिजिटल फाइल देण्यात आली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 26 November 2024Pan 2.0 : केंद्र सरकारकडून पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, पॅन कार्डमध्ये बदल होणारEknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब,  मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Embed widget