मशिनमुळे 2025 पर्यंत 10 पैकी 6 लोकांना गमवावा लागणार रोजगार; World Economic Forum चा अहवाल
World Economic Forum Report : येत्या चार वर्षात मशिनच्या किंवा तंत्रज्ञानाच्या वापराचा फटका रोजगाराला बसणार असून अर्ध्याहून जास्त लोकाना आपला रोजगार गमवावा लागणार असल्याचं World Economic Forum ने सांगितलं आहे.
World Economic Forum Report : तंत्रज्ञानाच्या वापरामुळे किंवा कामाच्या ठिकाणी मशिनच्या वापरामुळे 2025 पर्यंत जगातल्या दहा पैकी सहा लोकांना आपला रोजगार गमवावा लागणार असल्यांचं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने आपल्या अहवालात सांगितलं आहे.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने कन्सल्टिंग कंपनी असलेल्या PwC या कंपनीसोबत मिळून हा अहवाल तयार केला आहे. यासाठी जगभरातल्या 19 देशातल्या 32,000 कर्मचाऱ्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. येत्या पाच वर्षात आपल्याला आता ज्या ठिकाणी काम करतोय त्या रोजगाराला मुकावं लागणार आहे असं 40 टक्के कामगारांना वाटतंय. तर 56 टक्के लोकांना असं वाटतंय की त्यांच्या पैकी काहीच लोक दीर्घ काळासाठी त्यांचा रोजगार टिकवून ठेवू शकतात.
या अहवालातून असंही स्पष्ट झालं आहे की, जगभरातल्या 60 टक्के कर्मचाऱ्यांना असं वाटतंय की सरकारने त्यांचे रोजगार टिकून राहण्यासाठी काही प्रयत्न करणे गरजेचं आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात 40 टक्के कर्मचाऱ्यांनी आपले डिजिटल कौशल्य वाढवण्यावर भर दिला आहे तर 77 टक्के कर्मचारी हे नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी तयार आहेत. 80 टक्के कर्मचाऱ्यांना ते अत्याधुनिक डिजिटल कौशल्य शिकू शकतील याचा आत्मविश्वास आहे.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या गेल्या वेळच्या अहवालानुसार, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इन्टेलिजन्समुळे जगभरातील 8.5 कोटी रोजगार धोक्यात आले आहेत. पण त्याच वेळी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इन्टेलिजन्समुळे 9.7 कोटी नवे रोजगार निर्माण होणार असल्याचंही त्या अहवालात सांगण्यात आलं होतं.
महत्वाच्या बातम्या :
- AstraZeneca ची लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी, ब्रिटनमध्ये सात जणांचा मृत्यू
- LinkedIn देणार आपल्या 15,900 कर्मचाऱ्यांना 'रिचार्ज' होण्यासाठी एक आठवड्याची पगारी रजा
- Suez Canal | कार्गो शिपने केला सुएज कालवा 'ब्लॉक', जगाचं तासाला 2800 कोटी रुपयांचं नुकसान
- दुबईचे दुसऱ्या क्रमांकाचे शासक शेख हमदान बिन राशिद यांचं निधन, दुबईच्या विकासात महत्वपूर्ण योगदान