एक्स्प्लोर

Sun : नव्या संकटाची चाहूल? सूर्याची उष्णता कमी करण्याचा प्रयत्न, ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी शास्त्रज्ञांचं पाऊल

Dimming Sun Project : ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी शास्त्रज्ञांकडून सूर्याची उष्णता कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. काही शास्त्रज्ञांचा मते, हा अत्यंत धोकादायक प्रयोग मानत आहे.

Sun Dimming Project : सूर्य (Sun) आपल्या सौरमालेतील (Solar System) मुख्य घटक आहे. आपण सूर्यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहोत. आपला दिनक्रम आपलं संपूर्ण आयुष्य सूर्याभोवती फिरतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सध्या संपूर्ण जगासमोर एक मोठी समस्या निर्माण झाली आहे, ती म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग (Global Warming). शास्त्रज्ञांकडून सूर्याची उष्णता आणि ऊर्जा कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शास्त्रज्ञांचा एक गट ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. काही देशांमधील शास्त्रज्ञ सूर्याची उष्णता कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, काही शास्त्रज्ञांनी या प्रयोगाला विरोध केला आहे. त्यांच्या मते, हा प्रयोग पृथ्वीसाठी अतिशय धोकादायक आणि विनाशकारी ठरु शकतो. 

Sun Dimming Project : सूर्याची उष्णता कमी करण्याचा प्रयत्न

मीडिया रिपोर्टनुसार, काही शास्त्रज्ञ सूर्यप्रकाश आणि उष्णता वापरण्याच्या प्रकल्पावर काम करत आहेत. सूर्याची उष्णता कमी झाल्यास पृथ्वीवरील ग्लोबल वॉर्मिंगविरुद्धच्या मोहिमेत मोठे यश मिळेल, असा या शास्त्रज्ञांचा दावा आहे. मात्र, या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे की, हा प्रकल्प तातडीनं थांबवला नाही, तर येणाऱ्या काळात हे पृथ्वीसाठी घातक पाऊल ठरू शकतं. महत्त्वाचं म्हणजे शास्त्रज्ञांच्या दोन गटांमध्ये हा वादा सुरू असतानाही या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे.

Way to Reduce Global Warming : ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी विचित्र मार्ग

ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी काही शास्त्रज्ञांनी एक विचित्र मार्ग शोधला आहे. शास्त्रज्ञ एका यंत्राच्या साहाय्याने सूर्याची पृथ्वीवर येणारी उष्णता आणि सूर्यप्रकाश कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या यंत्रामुळे किमान सूर्यप्रकाश पृथ्वीवर येईल. याबाबत सध्या संशोधन सुरू असून या प्रकल्पावर आतापर्यंत मोठी गुंतवणूक झाली आहे. 

Solar Geo Engineering is Hamful or Not : प्रकल्पाबाबत धोक्याचा इशारा

सूर्याची उष्णता कमी करण्याच्या या प्रकल्पामध्ये मोठी गुंतवणूक झाल्याने आता या प्रकरणाच्या चर्चेलाही उधाण आलं आहे. सूर्यप्रकाश कमी करण्याच्या या संशोधनाला शास्त्रज्ञांनी 'सोलर जिओ इंजिनीअरिंग' (Solar Geo Engineering) असं म्हटलं आहे. या संशोधनामध्ये मोठा धोका असल्याचं सांगत काही शास्त्रज्ञांनी धोक्याचा इशारा दिला आहे. याबाबतच्या सर्व संभाव्य धोक्यांबाबत काही शास्त्रज्ञांनी इशारा दिल्यानंतरही या प्रकल्पावर काम करणारे शास्त्रज्ञ हा प्रकल्प थांबवण्याच्या विचारात नाहीत. 

Global Warming Research : अशी सूचली कल्पना?

जून 1991 मध्ये फिलीपिन्समधील माउंट पिनेताबू या ज्वालामुखीचा उद्रेक झाला. 20 व्या शतकातील या सर्वात मोठ्या स्फोटातून पसरलेली राख आकाशात सुमारे 28 मैल पसरली. यानंतर, पुढील 15 महिने संपूर्ण जगाचे तापमान सुमारे 1 अंशाने कमी झालं होतं. वातावरणातील राखेमुळे सूर्याची किरणे पूर्णपणे पृथ्वीवर पोहोचू शकत नव्हती. यातूनच शास्त्रज्ञांना नवीन कल्पना सुचली. सूर्य आणि वातावरण यांच्यामध्ये एखाद्या गोष्टीचा थर उभा राहिल्यास सूर्याची किरणे पूर्णपणे पृथ्वीपर्यंत पोहोचणार नाहीत, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे

Dim Light and heat of Sun : सूर्यप्रकाश कसा कमी होईल? 

सोलर जिओ इंजिनीअरिंग म्हणून ओळखल्या जाणार्‍या या प्रक्रियेत शास्त्रज्ञ मोठ्या फुग्यांद्वारे पृथ्वीबाहेरील वातावरणाच्या वरच्या भागावर सल्फर डायऑक्साइडची फवारणी करतील. सल्फरमध्ये गुणधर्म आहेत, जे सूर्याच्या किरणांना परावर्तित करतात. त्यामुळे सूर्यप्रकाश परावर्तित झाल्याने पृथ्वीवर येणारा सूर्यप्रकाश कमी होईल.

What is Solar Geo Engineering : सोलर जिओ इंजिनीअरिंग तंत्र कसं काम करेल?

या प्रकल्पांतर्गत पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या थरावर सल्फरची फवारणी केली जाणार असल्याचे शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. सल्फरचा थर सूर्याच्या किरणांना परावर्तित करून पुन्हा अवकाशात पाठवेल. यामुळे सूर्यप्रकाश त्याच्या संपूर्ण उष्णतेसह पृथ्वीवर पोहोचू शकणार नाही. त्यामुळे पृथ्वीवरील तापमानात फारशी वाढ होणार नाही. या प्रकल्पावर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना विश्वास आहे की, यामुळे ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यात मदत होईल. आता त्यांना या प्रकल्पासाठी मोठी गुंतवणूक मिळाली असून या प्रकल्पाचे काम जोरात सुरू आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Magnetar: सूर्याहून हजारो पट अधिक लख्ख प्रकाश; अंतराळातील आणखी एक रहस्य, 'मॅग्नेटॉर' पाहून शास्त्रज्ञही अवाक्

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP MajhaTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 23 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
Embed widget