एक्स्प्लोर
Advertisement

(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'आपण धोकादायक टप्प्यावर, कोरोना अत्यंत वेगाने पसरतोय' : WHO
संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकलं आहे. दिवसागणिक कोरोना बाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) प्रमुखांनी देखील कोविड-19 महामारीचा प्रसार 'अत्यंत वेगाने' होत असल्याचं म्हटलं आहे.

जिनिव्हा: संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकलं आहे. दिवसागणिक कोरोना बाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) चे प्रमुखांनी देखील कोविड-19 महामारीचा प्रसार 'अत्यंत वेगाने' होत असल्याचं म्हटलं आहे. काल एका दिवसात आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आल्याचे सांगत त्यांनी ही भीती व्यक्त केली आहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस गेब्रेयेसस यांनी म्हटलं आहे की, नवीन कोरोना केसेसमधील अर्ध्या केसेस या उत्तर आणि दक्षिणी अमेरिका खंडातील आहेत तर दक्षिण आशिया आणि पश्चिम आशियात देखील कोरोनाचा प्रभाव मोठा आहे.
टेड्रोस गेब्रेयेसस यांनी म्हटलं आहे की, आता आपण नवीन आणि धोकादायक टप्प्यावर आहोत. महामारीला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक पावलं उचलण्याची अजूनही आवश्यकता आहे. अनेक लोक घरात राहून निराश आहेत तर काही देश बंधनं उठवण्यासाठी उत्सुक आहेत.
टेड्रोस यांनी सांगितलं की, कोरोना व्हायरस अजूनही अत्यंत वेगाने पसरत आहे. यामुळं फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क लावणे आणि हात धुण्यासारख्या गोष्टी कटाक्षानं पाळणे गरजेचे आहे. ते म्हणाले की, मृतकांची संख्या खासकरुन निर्वासितांमध्ये जास्त असेल. यातील 80 टक्क्यांहून अधिक विकसनशील देशांमध्ये राहात आहेत.
Coronavirus | अख्खं जग कोरोनाच्या विळख्यात! जगभरातील कोरोना बाधितांची संख्या 87 लाख पार
वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसमुळे 87 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या चार लाख 61 हजारांवर पोहोचली आहे. तसेच 46 लाख 20 हजारांहून अधिक लोक ठिक झाले आहेत. जगभरात जवळपास 62 टक्के कोरोनाचे रुग्ण फक्त 8 देशांमध्ये आढळून आले आहेत. या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 51 लाखांहून अधिक आहे.
कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव अमेरिकेत आहे. अमेरिकेमध्ये 22 लाखांहून अधिक लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. एक लाख 21 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु, आता दरदिवशी ब्राझीलमध्ये अमेरिकेहून अधिक रुग्ण आणि मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. अमेरिकेमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 33158 रुग्ण आढळून आले आहेत, तर 714 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ब्राझीलमध्ये 24 तासात 55,209 रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत एकूण 49,090 लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलनंतर रशिया आणि भारतात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे.
ब्राझील, रशिया, स्पेन, यूके, इटली, भारत, पेरूमध्ये कोरोना बाधितांची संख्या दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. याव्यतिरिक्त आठ देश असे आहेत, जिथे एक लाखांहून अधिक कोरोना बाधित आहेत. चार देश (अमेरिका, ब्राझील, ब्रिटन, इटली) असे आहेत, जिथे 30 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये मृतांचा आकडा 1.21 लाखांहून अधिक झाला आहे. चीन टॉप-18 कोरोना बाधित देशांच्या यादीतून बाहेर पडला असून भारताचा समावेश कोरोनाचा प्रादुर्भाव असणाऱ्या टॉप-4 देशांमध्ये झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोनावर प्रभावी लस येऊ शकते : डब्ल्यूएचओ
कोरोनावर औषध मिळालं! 'डेक्सामेथासोन'नं रुग्ण बरे होत असल्याचा दावा
कोरोनावर औषध सापडलं! रुग्ण बरं होण्याचं प्रमाण जवळपास 99.99 टक्के, योगगुरु रामदेवबाबांचा दावा
चीनच्या उलट्या बोंबा! प्रवक्ते म्हणतात, भारतानं आपलं सैन्य ताब्यात ठेवावं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
भारत
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
