एक्स्प्लोर

BMC Election 2026: मोठी बातमी: शिंदे गटाचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, मुंबईच्या राजकारणात उलथापालथ होणार?

BMC Election 2026: एकनाथ शिंदे यांनी अचानक आपल्या 29 नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँडस एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले आहे. संजय राऊत यांनी आपण तिकडे जाणार असल्याचे म्हटले.

BMC Election 2026: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप-शिंदे सेनेला काठावरचे बहुमत मिळाल्यानंतर आता मुंबईचा महापौर कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईचा महापौर कोण होणार, यावरुन सध्या प्रचंड रस्सीखेच सुरु आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून मुंबईत सुरुवातीच्या अडीच वर्षांसाठी महापौर पदावर दावा केला जाण्याची शक्यता आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनी 'देवा'च्या मनात असेल तर मुंबईचा महापौर शिवसेनेचा (Shivsena) होईल, असे वक्तव्य करुन सस्पेन्स वाढवला होता. या सगळ्या घडामोडी सुरु असताना मुंबईत पडद्यामागे गुप्तपणे वाटाघाटी सुरु असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यानुसार ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्या नगरसेवकांशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सध्या दाव्होस आर्थिक परिषदेसाठी परदेशात गेले आहेत. या काळात दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच ठाकरे गटाकडून आपल्या नगरसेवकांशी संपर्क साधण्यात आल्याची कुणकुण लागल्याने एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व 29 नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँडस् एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवल्याचे समजते. मुंबई महानगरपालिकेत सत्तास्थापना होईपर्यंत या नगरसेवकांना हॉटेलमध्येच ठेवले जाणार आहे.

एकीकडे शिवसेनेचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात असल्यामुळे एकनाथ शिंदे यांना धोका असला तरी त्याचवेळी त्यांच्यासमोर नवी संधीही निर्माण झाली आहे. भाजपचे 89 नगरसेवक निवडून आल्याने त्यांना 114 हा मॅजिक फिगरचा आकडा गाठण्यासाठी एकनाथ शिंदे यांची मदत घेणे अपरिहार्य आहे. हीच गरज ओळखून एकनाथ शिंदे यांच्याकडून अडीच-अडीच वर्षांच्या महापौरपदाचा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला जाऊ शकतो. मुंबई महानगरपालिकेतील महापौरपदाची समान वाटणी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात करावी. तसेच स्थायी समिती व इतर महत्त्वाच्या समित्यांमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांना योग्य प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडून केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बीएमसीतील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या हालचालींमुळे मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Mumbai Mayor Election 2026: शिंदे गटाचे काही नगरसेवक थेट उद्धव ठाकरेंच्या संपर्कात?

'द न्यू इंडियन एक्स्प्रेस' दैनिकाच्या माहितीनुसार, शिंदे गटाचे काही नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत. शिंदे गटाच्या या नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला फोन केल्याची माहिती आहे. आमच्या मनात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविषयी कोणतेही वैर नाही, असे या नगरसेवकांनी सांगितल्याचे समजते. या सगळ्या घडामोडींनंतर उद्धव ठाकरे यांनी महापौरपदाबाबत सूचक वक्तव्य केल्याचे सांगितले जाते. 'जर देवाची इच्छा असेल तर मुंबई महानगरपालिकेचा पुढचा महापौर आपला असेल', असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलसुलट चर्चांना प्रचंड उधाण आले आहे. 

आणखी वाचा

...तर शिंदेंनी 29 नगरसेवक कोंडून ठेवले नसते, संजय राऊतांची 'देवाभाऊ', 'एकनाथ भाईं'वर बोचरी टीका; म्हणाले, फडणवीस वेताळाप्रमाणे..

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report
Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
Embed widget