एक्स्प्लोर
Corona Virus | कोरोनावर औषध मिळालं! 'डेक्सामेथासोन'नं रुग्ण बरे होत असल्याचा दावा
कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांवर डेक्सामेथासोन (Dexamethasone) हे औषध प्रभावी ठरत आहे. स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारं डेक्सामेथासोन या औषधानं कोरोनाची लागण झालेल्या अति जोखमीच्या रुग्णांचं जीव वाचले आहेत. डेक्सामेथासोनवर जगभरात संशोधन सुरु आहे.
![Corona Virus | कोरोनावर औषध मिळालं! 'डेक्सामेथासोन'नं रुग्ण बरे होत असल्याचा दावा Dexamethasone Corona Vaccine life saving medicine on covid 19 virus Corona Virus | कोरोनावर औषध मिळालं! 'डेक्सामेथासोन'नं रुग्ण बरे होत असल्याचा दावा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/06/17153714/dexamethasone.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : कोरोना व्हायरस महामारीवर औषध शोधण्यासाठी जगभरात प्रयत्न केले जात आहेत. यातच ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांवर डेक्सामेथासोन (Dexamethasone) हे औषध प्रभावी ठरत आहे. स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारं डेक्सामेथासोन या औषधानं कोरोनाची लागण झालेल्या अति जोखमीच्या रुग्णांचं जीव वाचले आहेत. डेक्सामेथासोनवर जगभरात संशोधन सुरु आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या परीक्षणातून असं समोर आलं आहे की, जे लोकं व्हेंटिलेटरवर होते त्यांच्या डेक्सामेथासोनचा उपयोग केला असता त्यांच्या मृत्यूचे प्रमाण एक तृतीअंश कमी झालं आहे.
व्हेंटिलेटरवरील रुग्णांसाठी आशेचा किरण
संशोधकांच्या मते, ब्रिटनमध्ये महामारीच्या सुरुवातीला या औषधाचा वापर केला असता तर जवळपास 5 हजार लोकांचा जीव वाचला असता. या औषधाचा कोरोना रुग्णांवर केलेल्या प्रयोगानंतर अतिजोखमीच्या रुग्णांवर डेक्सामेथासोन प्रभावी ठरत असल्याचं समोर आलंय. डेक्सामेथासोन व्हेंटिलेटरवरील तसेच ज्या रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होतोय, अशा रुग्णांवर प्रभावी ठरत असल्याचं बोललं जात आहे.
हॉस्पीटलमध्ये दाखल न होता 20 पैकी 19 रुग्ण ठीक झाल्याचा दावा
डेक्सामेथासोनमुळं कोरोना संसर्ग झालेले पण दवाखान्यात भर्ती न झालेले 20 पैकी 19 रुग्ण बरे झाल्याचा दावा केला आहे. तर दवाखान्यात दाखल रुग्णही बरे झाले आहेत मात्र त्यांना ऑक्सिजनसह आणखी काही गोष्टींची गरज पडली. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या एका टीमने केलेल्या संशोधनात दवाखान्यात दाखल 2 हजार रुग्णांना हे औषध दिलं गेलं. तर दवाखान्यात नसलेले पण कोरोना झालेल्या 4 हजार रुग्णांना हे औषध दिलं गेलं. या औषधामुळं जे रुग्ण व्हेंटिलेटरवर होते त्यांच्या मृत्यूचा धोका 40 टक्क्यांवरुन कमी होत 28 टक्क्यांवर आला आहे. ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज होती, त्यांच्या मृत्यूचा धोका हा 25 वरुन 20 टक्क्यांवर आला, असा दावा केला आहे.
कोरोनावर औषध सापडलं! रुग्ण बरं होण्याचं प्रमाण जवळपास 99.99 टक्के, योगगुरु रामदेवबाबांचा दावा
ब्रिटन पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी म्हटलं आहे की, या संशोधनामुळं नक्कीच आनंद व्यक्त केला जाऊ शकतो. आम्ही या औषधाचं सप्लाय करण्यासंदर्भात योग्य पावलं उचलली आहेत. संशोधक प्रोफेसर पीटर होर्बी यांनी दावा केला आहे की, आतापर्यंत हेच औषध आहे ज्यामुळं मृत्युदर कमी झाला आहे. प्रोफेसर लॅंडरी यांनी दवाखान्यात भर्ती रुग्णांवर या औषधाचा उपयोग करावा असं म्हटलंय तर जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी डेक्सामेथासोनचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याने गंभीर आजारी लोकांवरच करावा असं म्हटलंय. हे औषध योग्य प्रकारे न घेतल्यास धोका संभवू शकतो, असंही त्यांनी म्हटलंय.
डेक्सामेथासोन हे औषध स्वस्त देखील असल्याने जगभरातील गरीब देशांना देखील याचा लाभ होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)