एक्स्प्लोर

Covid Vaccine | वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोनावर प्रभावी लस येऊ शकते : डब्ल्यूएचओ

सध्या जीवघेण्या कोरोना व्हायरसविरोधात संपूर्ण जग लढा देत आहे. अशात या वर्षा अखेरपर्यंत कोरोनावर प्रभावी लस येऊ शकते, असं डब्ल्यूएचओच्या मुख्य संशोधक डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितलं आहे.

लंडन : जागतिक आरोग्य संघटनेतील (डब्ल्यूएचओ) मुख्य संशोधक डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी गुरुवारी बोलताना सांगितले की, या वर्षा अखेरीस कोरोना व्हायरसवर प्रभावी लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरसवर उपचारासाठी प्रभावी लस तयार करण्यासाठी सुरु असणाऱ्या वैद्यकीय चाचण्यांच्या दृष्टीने जिनेवा येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना स्मामीनाथन म्हणाल्या की, 'आतापर्यंत कोरोना रोखण्यासाठी प्रभावी समजलं जाणारं हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध, कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना मृत्यूपासून दूर ठेवण्यासाठी प्रभावी नसल्याचं निष्पन्न झालं आहे.'

भविष्यात या जीवघेण्या कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी प्रभावी लस तयार करण्यासंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या की, 'सुमारे दहा उमेदवार मानवी चाचणी टप्प्यात असून त्यापैकी तीन उमेदवार नवीन टप्प्यात प्रवेश करत आहेत. त्यामुळे ही लस प्रभावी ठरत असल्याचं सिद्ध होत आहे.'

प्रभावी औषधाबाबत डब्ल्यूएचओच्या प्रयत्नांचा उल्लेख करत स्वामीनाथन पुढे म्हणाले की, 'मी आशा करते. मी आशावादी आहे. परंतु, लस विकसित करण्यासाठी एक अत्यंत किचकट प्रक्रिया असते आणि यामध्ये अत्यंत अनिश्चितताही असते. चांगली गोष्ट म्हणजे, आपल्याकडे अनेक वेगवेगळे उमेदवार आहेत, तसेच अनेक प्लॅटफॉर्मही आहेत.'

पुढे बोलताना त्या म्हणाले की, 'जर आपण भाग्यवान असू तर, या वर्षा अखेरपर्यंत एक किंवा दोन प्रभावी उमेदवार असतील.' तसेच डॉ. सौम्या स्वामीनाथन यांचं असंही म्हणणं आहे की, लोकांना कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडण्यापासून वाचवण्यासाठी मलेरियावर प्रभावी ठरणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची भूमिका असू शकते. यावर सध्या क्लिनिकल परिक्षण सुरु आहेत. तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, 'अद्याप कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन नेमकं कोणती आणि काय भूमिका बजावतं हे स्पष्ट झालेलं नाही. त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने करण्यात येणाऱ्या इतर परिक्षणांसंदर्भात बोलताना सांगितले की, 'आम्हाला आतापर्यंत हे माहिती नाही, त्यामुळे मोठ्या स्तरावर परिक्षणं पूर्ण करणं आणि आकडे मिळवण्याची गरज आहे.'

महत्त्वाच्या बातम्या : 

कोरोनावर औषध मिळालं! 'डेक्सामेथासोन'नं रुग्ण बरे होत असल्याचा दावा

कोरोनावर औषध सापडलं! रुग्ण बरं होण्याचं प्रमाण जवळपास 99.99 टक्के, योगगुरु रामदेवबाबांचा दावा

चीनच्या उलट्या बोंबा! प्रवक्ते म्हणतात, भारतानं आपलं सैन्य ताब्यात ठेवावं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

नालासोपाऱ्यात दादागिरी करणाऱ्या टीसीचं निलंबन, 'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 05 November 2024Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Embed widget