एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
चीनच्या उलट्या बोंबा! प्रवक्ते म्हणतात, भारतानं आपलं सैन्य ताब्यात ठेवावं
भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात झालेल्या दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. यानंतर चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्यांनी मात्र भारतावरच आरोप केले आहेत. 6 जूनच्या चर्चेनुसार चीनच्या सैनिकांना त्यांच्या सीमेत आणखी मागे जाण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र शांततेत चर्चा करण्याऐवजी चीनने वाद घालण्यास सुरुवात केली.
![चीनच्या उलट्या बोंबा! प्रवक्ते म्हणतात, भारतानं आपलं सैन्य ताब्यात ठेवावं india china border dispute china said on current galwan valley clash चीनच्या उलट्या बोंबा! प्रवक्ते म्हणतात, भारतानं आपलं सैन्य ताब्यात ठेवावं](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/06/17144516/unnamed-file.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली: भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात झालेल्या दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. दरम्यान चीनच्या सरकारी मीडियाने चीनी सेनेच्या हवाल्याने दावा केला आहे की, गलवान घाटीवर नेहमी त्यांचा अधिकार राहिला आहे. तसंच आरोप केला आहे की, भारतीय सैनिकांनी जाणूनबुझून उकसवणारे हल्ले केले, त्यामुळं गंभीर संघर्ष झाला आणि जवान शहीद झाले. चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिनजियान यांनी म्हटलं आहे की, भारताने आपलं सैन्य ताब्यात ठेवावं. आपल्या सैनिकांवर नियंत्रण ठेवावं. सीमारेषा पार करु नये. कुठलीही समस्या निर्माण करु नये आणि एकतर्फी पाऊल उचलू नये, ज्यामुळं मुद्दा आणखी चिघळेल.
भारतीय लष्कराने काल ही माहिती दिली आहे. 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात ही हिंसक झडप झाली होती. एएनआयच्या माहितीनुसार चीनचेही 43 जवान मारले गेलेत किंवा जखमी झाले आहेत. गेल्या 45 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं आहे की, चीन आणि भारतादरम्यान संघर्षात जवान शहीद झाले आहेत.
India-China Face Off | चीनसोबत झालेल्या हिंसक झडपेत 20 भारतीय जवान शहीद
चीनने काय आरोप केला?
चीनने आरोप केला आहे की, भारतीय सैनिकांनी 15 जून रोजी दोन वेळा अवैध कारणांनी चीनच्या सीमेत प्रवेश केला तसंच चीनच्या सैनिकांना डिवचत त्यांच्यावर हल्ले केले. त्यामुळं दोन्ही सैन्यांमध्ये मारपीट झाली. सोबतच चीनने भारतीय लष्कराच्या 'गलवान व्हॅलीत तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत असताना सैनिकांमध्ये झडप झाली' या दाव्याचा देखील विरोध केला आहे.
India China Border Live Updates | पंतप्रधानांनी मौन का धारण केलंय, ते काय लपवत आहेत? : राहुल गांधी
चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिनजियान यांना सीमेवर भारतीय सैनिक शहीद झाल्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, याबाबत मला माहिती नाही. ते म्हणाले की, आमच्या सैनिकांची एक उच्चस्तरीय बैठक झाली होती आणि सीमेवर स्थिती सामान्य करण्यासाठी सहमती देखील दर्शवली होती. मात्र 15 जून रोजी भारतीय सैनिकांनी सीमेचं उल्लंघन केलं. दोन वेळा त्यांनी आमच्या सीमेत प्रवेश केला.
India-China Face Off | जवानांच्या बलिदानाचं दु:ख शब्दात व्यक्त करु शकत नाही : राहुल गांधी
प्रवक्ता झाओ लिनजियान म्हणाले की, भारताने आपलं सैन्य ताब्यात ठेवावं. आपल्या सैनिकांवर नियंत्रण ठेवावं. सीमारेषा पार करु नये. कुठलीही समस्या निर्माण करु नये आणि एकतर्फी पाऊल उचलू नये, ज्यामुळं मुद्दा आणखी चिघळेल. झाओ यांनी म्हटलं की, दोन्ही देशांचं संवाद आणि चर्चेद्वारे या मुद्द्यावर तोडगा काढण्यावर एकमत झालं आहे.
भारत आणि चीनमध्ये 6 जून रोजी मेजर जनरल रँक लेव्हलची चर्चा झाली होती. यामध्ये सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यावर सहमती झाली होती. 6 जूनच्या चर्चेनुसार चीनच्या सैनिकांना त्यांच्या सीमेत आणखी मागे जाण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र शांततेत चर्चा करण्याऐवजी चीनने वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर भारतीय सैनिक आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक झडप झाली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
शेत-शिवार
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)