एक्स्प्लोर
Advertisement
हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनची ट्रायल बंद करण्याची शिफारस WHO कडून मागे
इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या वापराने काहीही धोका नसल्याचं सांगितलं होतं. अखेर कोरोनासाठी वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या मलेरियाच्या औषधाच्या ट्रायल बंद करण्याची शिफारस WHO ने मागे घेतली आहे.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचारासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाचा वापर करु नये, अशा सूचना जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्लूएचओ) दिल्या होत्या. या औषधाचा वापर मलेरियाच्या रुग्णांवर उपचारासाठी होतो. या दरम्यान इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या वापराने काहीही धोका नसल्याचं सांगितलं होतं. अखेर कोरोनासाठी वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या मलेरियाच्या औषधाच्या ट्रायल बंद करण्याची शिफारस WHO ने मागे घेतली आहे.
डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयेसुस म्हणाले की, बोर्डाने अभ्यास करुन कोरोना मृत्युदरांचा आढावा घेतला आहे. या दरम्यान हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन चाचणी सुधारित करण्याचे कोणतेही कारण नाही, असे आढळले. त्यामुळं डब्ल्यूएचओनं हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनवर सुरु असलेल्या संशोधनात सहभागी संशोधकांना त्यांचे काम पुन्हा सुरू करण्यास सांगितलं आहे.
हा विज्ञानाचा मोठा विजय असल्याचं संशोधक डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी म्हटलं आहे. भारताने या ट्रायल थांबवण्यासाठी विरोध केला होता. WHO कडून ही शिफारस मागे घेतल्यानंतर सीएसआयआरच्या डॉ शेखर मांडे यांचंही माशेलकर यांनी कौतुक केलं आहे. हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनने कोरोना बरा होतो की नाही हा संशोधनाचा विषय आहे. सुरवातीला काही अडचणी आल्या म्हणून संशोधन थांबवायला नको असं माशेलकर यांचं म्हणणं आहे.
हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनमुळे कोणताही धोका नाही, WHO च्या बंदीनंतर ICMR चं स्पष्टीकरण जागतिक आरोग्य संघटनेनं खबरदारी म्हणून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची क्लिनिकल चाचणी तात्पुरती बंद केली होती. हा निर्णय एका रिपोर्टच्या आधारे घेतल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. या रिपोर्टमध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्यांमुळे कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो, असा दावा केला जात आहे. या रिपोर्टच्या आधारावर या गोळ्यांचा वापर बंद केल्याचं डब्ल्यूएचओने सांगितलं होतं. कोरोनाबाधितांवर उपचारासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या क्लिनिकल ट्रायलवर बंदी; WHOचे आदेश यानंतर इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या वापराने काहीही धोका नसल्याचं सांगितलं होतं. आयसीएमआरच्या एका अधिकाऱ्याने म्हटलं होतं की, कोरोना व्हायरस नवीन आजार आहे. यावर ठराविक उपचार पद्धती नाही आणि यावर औषधही उपलब्ध नसून त्यावर संशोधन सुरु आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनवर एम्स आणि दिल्लीतील तीन खासगी रुग्णालयांमध्ये कन्ट्रोल्ड स्टडी केली गेली आहे. या स्टडीमध्ये हे औषध कोरोनावरही काम करु शकतं आणि त्याचे फार दुष्परिणामही नाहीत. मात्र हे औषध देताना रुग्णाची ईसीजी तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे. Dr Shekhar Mande | कोरोना व्हायरसविरोधात कशा प्रकारे संशोधन सुरू आहे? डॉ. शेखर मांडेंशी संवादWHO resumes hydroxychloroquine study for Covid-19https://t.co/lRYieSmKBG
Congrats @shekhar_mande for this fight by @CSIR_IND questioning the arbitrary stoppage Science must win finally to decide the fate of HCQ, whatever it is! https://t.co/kpIbiJa2xu — Raghunath Mashelkar (@rameshmashelkar) June 3, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement