एक्स्प्लोर
विजय माल्ल्याची श्रीमंत 'गरीबी', पत्नीच्या पैशांवर उदरनिर्वाह सुरु, बँक खाती न गोठविण्याची विनंती
विशेष म्हणजे माल्ल्यानं ब्रिटीश सरकारचेही करापोटी 2.40 कोटी रुपये थकविले आहेत. तर, लंडनमधील आलिशान लाईफस्टाईलसाठी माल्ल्याचा एका आठवड्याला तब्बल 16 लाख रुपये खर्च होतो.

लंडन : देशाला 9 हजार कोटींचा चुना लावणारा विजय माल्ल्याबाबत नवी माहिती समोर आली आहे. वेगवेगळ्या कारणांनी नेहमी चर्चेत असणाऱ्या माल्ल्याची आता गरिबी उजेडात आली आहे. लंडनच्या कोर्टात विजय माल्ल्याविरोधात दाखल दिवाळखोरीच्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. VIDEO | मी उधारीवर जगतोय, खाती गोठवू नका, विजय माल्ल्याचा अजब युक्तिवाद | लंडन | एबीपी माझा त्यात विजय माल्ल्यानं पत्नीच्या पैशांवर आपला उदरनिर्वाह सुरु आहे. साहाय्यक आणि ओळखीच्या लोकांकडूनही पैसे उधार घेतले आहेत, तरी आपली बँक खाती गोठवू नका, अशी विनवणी कोर्टाकडे केली आहे. विशेष म्हणजे माल्ल्यानं ब्रिटीश सरकारचेही करापोटी 2.40 कोटी रुपये थकविले आहेत. तर, लंडनमधील आलिशान लाईफस्टाईलसाठी माल्ल्याचा एका आठवड्याला तब्बल 16 लाख रुपये खर्च होतो. त्यातले 90 हजार तर फक्त त्याच्या रेशनिंगवर खर्च होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आणखी वाचा























