(Source: Poll of Polls)
Vietnam Fire : व्हिएतनाममध्ये इमारतीत आग, 12 हून अधिक रहिवाशांचा होरपळून मृत्यू, 50 हून अधिक जखमी
Vietnam Fire : व्हिएतनाममधील अपार्टमेंट बिल्डिंगमध्ये लागलेल्या भीषण आगीत डझनभर नागरिकांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. व्हिएतनामची राजधानी हनोईमध्ये मंगळवारी रात्री ही आग लागल्याचं समजतं.
Vietnam Fire : व्हिएतनाममधील (Vietnam) अपार्टमेंट बिल्डिंगमध्ये लागलेल्या भीषण आगीत डझनभर नागरिकांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. व्हिएतनामची राजधानी हनोईमध्ये मंगळवारी रात्री ही आग (Fire) लागल्याचं समजतं. आगीचं नेमकं कारण बुधवारी (13 सप्टेंबर) सकाळपर्यंत समजू शकलेलं नाही. स्थानिक वेळेनुसार रात्री साडे अकराच्या सुमारास ही आग लागली, त्यावेळी इमारतीमधील रहिवासी घरात झोपलेले असताना आग लागली. पहाटे दोन वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं, अशी माहिती व्हिएतनामच्या न्यूज एजन्सीने दिली.
रहिवासी झोपलेले असताना आगीचा भडका
हनोईच्या नैऋत्यकडील निवासी भागात असलेल्या अरुंद गल्लीत असलेल्या नऊ मजली अपार्टमेंट बिल्डिंगमध्ये 150 लोक राहत होते. इमारतीमधील रहिवासी झोपलेले असताना रात्री अचानक आग लागली. यात डझनभर नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला. इमारतीमधून सुमारे 70 जणांना वाचवण्यात आलं, त्यापैकी 54 जणांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तत्पूर्वी अधिकाऱ्यांनी मृतांच्या संख्येची अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. आगीत 12 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश आहे.
घटनास्थळी नेमकं काय घडलं?
आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आत आणि बाहेर जाण्यासाठी इमारतीमध्ये एकच मार्ग होता. तसंच या इमारतीत कोणताही आपत्कालीन मार्ग नसल्याने अनेकाना बाहेर पडण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी शिडीच्या मदतीने घरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढलं. मदतीसाठी ओरडण्याचा आवाज आला, परंतु अपार्टमेंट बंदिस्त असल्याने आम्ही त्यांना फारशी मदत करु शकलो नाही, असं एका महिलेने सांगितलं. तर आगीपासून वाचण्यासाठी एक लहान मुलाला घरातून खाली फेकल्याचं एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.
व्हिएतनाममध्ये आगीच्या घटनांमध्ये वाढ
पोलिसांनी आगीच्या कारणाचा तपास सुरु केला आहे. दरम्यान व्हिएतनाममध्ये अलिकडच्या काळात आगीच्या अनेक मोठ्या घटना घडल्या आहेत. बहुतांश आग या कराओके बार सारख्या मनोरंजनाच्या ठिकाणी लागल्या आहेत. वर्षभरापूर्वी हो ची मिन्ह सिटी इथल्या तीन मजली कराओके बारमध्ये लागलेल्या आगीत 32 जणांचा मृत्यू झाला होता. त्या आगीत 17 लोक जखमी झाले होते. आग प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली मालकाला अटक करण्यात आली होती. तर
2018 मध्ये हो चिन मिन्ह सिटीमधीलच एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्सला आग लागल्याने 13 लोकांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा
'या' देशात तुमच्या 1500 रूपयांचे होतात चार लाख रूपये, कमी पैशात जगू शकता श्रीमंतांसारखे जीवन