'या' देशात तुमच्या 1500रूपयांचे होतात चार लाख रूपये, कमी पैशात जगू शकता श्रीमंतांसारखे जीवन
Indian Rupees : सध्या व्हिएतनाममध्ये (vietnam ) एका भारतीय रुपयाचे मूल्य 287.13 व्हिएतनामी डोंग आहे. म्हणजेच जर तुम्ही या देशात 1500 रुपये घेतले तर ते 4,30,434.22 व्हिएतनामी डोंग होईल.
Indian Rupees : भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत कमकुवत आहे. परंतु, अशा अनेक देशांची चलने आहेत ज्यांच्या तुलनेत भारतीय रुपया खूप मजबूत आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका देशाबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही 1500 भारतीय रुपये घेऊन गेलात तर तेथे ते चार लाख रूपये होतील. या देशाचे नाव आहे व्हिएतनाम (vietnam). व्हिएतनाम आपल्या स्ट्रीट फूड, संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. भारतातून संपूर्ण व्हिएतनाममध्ये अवघे काही हजार रुपये घेऊन तुम्ही या देशातील श्रीमंत माणसाप्रमाणे प्रवास करू शकता.
एक रुपया म्हणजे 287.13 व्हिएतनामी डोंग
सध्या व्हिएतनाममध्ये (vietnam ) एका भारतीय रुपयाचे मूल्य 287.13 व्हिएतनामी डोंग आहे. म्हणजेच जर तुम्ही या देशात 1500 भारतीय रुपये घेतले तर ते 4,30,434.22 व्हिएतनामी डोंग होईल. एवढ्या पैशात तुम्ही हॉटेलपासून ते जेवणापर्यंत सर्व काही करू शकाल. याच्या मदतीने तुम्ही व्हिएतनामच्या प्रत्येक कोपऱ्यात फिरू शकाल.
vietnam : व्हिएतनामला कधी भेट द्यायची?
व्हिएतनामला भेट देण्यासाठी तुम्हाला विशिष्ट हंगामाची वाट पाहण्याची गरज नाही. येथे तुम्ही कोणत्याही हंगामात फिरायला जाऊ शकता. परंतु, बहुतेक पर्यटक डिसेंबर ते जानेवारी दरम्यान येथे जाण्यास प्राधान्य देतात. या दरम्यान लोक येथे नवीन वर्ष साजरे करतात. खरे तर परदेशात नववर्षाचे सेलिब्रेशन जेवढे चांगले असते तेवढेच इथे स्वस्तातही साजरे केले जाते.
vietnam : व्हिएतनाममध्ये कोठे-कोठे फिरणार?
जर तुम्ही व्हिएतनामला भेट देणार असाल तर तुम्ही तिथल्या हॅलोंग बेला भेट देऊ शकता. हे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणाला बे ऑफ डिकेइंग ड्रॅगन असेही म्हणतात. 1994 मध्ये युनेस्कोने या शहराचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश केला. व्हिएतनाममध्ये भेट देण्यासाठी हनोई हे देखील एक उत्तम ठिकाण आहे. हनोई ही व्हिएतनामची राजधानी आहे. हे शहर इतिहासाशी निगडीत आहे. या शहराला एकदा भेट दिली की इथे राहावेसे वाटते. व्हिएतनामच्या उत्तरेला वसलेले जिआंग येथे येणाऱ्या पर्यटकांमध्येही खूप लोकप्रिय आहे. व्हिएतनामला भेट देणारा प्रत्येक माणूस या शहरात जातो. जर तुम्ही व्हिएतनामला भेट देण्याचा विचार करत असाल आणि तेथील नैसर्गिक सौंदर्याचा लाभ घ्यायचा असेल तर हे ठिकाण फक्त तुमच्यासाठी आहे.
महत्वाच्या बातम्या