एक्स्प्लोर

सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, खोदकाम करताना 23 जणांचा दुर्देवी मृत्यू

व्हेनेझुएलामध्ये खाणीखाली दबून 23 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. आणखी अनेक कामगार खाणीत अडकल्याची माहिती मिळत आहे.

नवी दिल्ली : व्हेनेझुएलामध्ये (Venezuela) खाणीखाली दबून 23 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. आणखी अनेक कामगार खाणीत अडकल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. सोन्याच्या खाणीत खोदकाम सुरू असताना ही घटना घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बोलिव्हर (Bolivar) राज्यातील 'बुला लोका' (Bulla loca) येथील अवैध खाणीत (Gold Mine) हा प्रकार घडला असून घटनास्थळी अजून शोधमोहीम सुरू असल्याचे अंगोस्तुरा नगरपालिकेच्या महापौर योर्गी अर्सिनिएगा (Yorgi Arciniega) यांनी म्हटले आहे. मात्र या खाणीपर्यंत तासाभराचा बोटीचा प्रवास केल्यानंतरच पोहोचता येते. त्यामुळे बचावकार्य अडथळे उद्भवत आहेत. नागरी संरक्षण उपमंत्री कार्लोस पेरेझ एम्पुएडा (Carlos Perez Ampueda) यांनी ट्विटरवर या घटनेचा व्हिडिओ जारी केला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. घटनेच्या वेळी खाणीत सुमारे 200 लोक काम करत असल्याचे समजते.

जखमींवर उपचार सुरु

अनेक कामगार खाणीच्या उथळ पाण्यात काम करत होते. जेव्हा मातीची भिंत त्यांच्यावर कोसळत होती. तेव्हा काही कामगारांना घटनास्थळावरून बाहेर पडण्यात यश आले तर अनेक जण त्यात अडकले आहेत. जखमींना प्रादेशिक राजधानी सियुदाद बोलिव्हर (Ciudad Bolivar) येथील रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.  शोधकार्यात मदत करण्यासाठी कराकसमधून बचाव पथकेही पाठवण्यात आली आहेत. कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप कामगारांच्या (Workers) नातेवाईकांनी केला आहे.

गेल्या वर्षीही खाण कोसळून 12 जणांचा मृत्यू

बोलिव्हर प्रदेश सोने, हिरे, लोखंड, बॉक्साईट, क्वार्ट्ज आणि कोल्टन यांनी समृद्ध आहे. राज्याच्या खाणींव्यतिरिक्त, बेकायदेशीर उत्खननाचा उद्योगही तेथे मोठ्या प्रमाणावर चालतो. 2016 मध्ये व्हेनेझुएलाच्या (Venezuela) सरकारने आपल्या तेल उद्योगात नवीन महसूल जोडण्यासाठी देशाच्या मध्यभागी विस्तीर्ण खाण विकास क्षेत्र स्थापित केले. येथील खाणींमधून भरपूर सोने उपलब्ध होत असल्याने लोक आपल्या उदरनिर्वाहासाठी येथील खाणींमध्ये खोदकामासाठी जातात. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये याच प्रदेशातील इकाबारू येथे खाण कोसळून किमान १२ जणांचा मृत्यू झाला होता.

इतर महत्वाच्या बातम्या 

Russia vs America : रशियाने तयार केले सॅटेलाईट नष्ट करू शकणारे अण्वस्त्र? अमेरिकेचा दावा, पुतिन यांचा खुलासा

Elon Musk : रुग्ण फक्त विचार करून कम्प्युटर माऊस नियंत्रित करू शकतो, न्यूरालिंकबाबत इलॉन मस्कचा मोठा दावा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sushma Andhare on Raj Thackeray : राज ठाकरे सुपाऱ्या वाजवतात, सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोलABP Majha Headlines : 11 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech Thane Sabha : फोडाफोडी, शरद पवार ते उद्धव ठाकरे, सभेत राज ठाकरे बरसलेTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 PM: 12 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
Embed widget