एक्स्प्लोर
वसईतील तरुणाची जमैकात गोळ्या झाडून हत्या
वसई : मुंबईजवळच्या वसईतील तरुणाची जमैकामध्ये हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. जमैकाची राजधानी किंग्स्टनमध्ये ज्वेलर्सच्या दुकानात काम करणाऱ्या राकेश तलरेजा या वसईतील तरुणाची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी राकेशचा मृतदेह लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
दुकानातील रोख रक्कम घेऊन घरी जाणाऱ्या राकेश आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांवर हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. त्यानंतर तिघांकडील रोख रक्कम लुटून नेण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून जमैका पोलिस अधिक तपास करत आहेत.
राकेश दोन वर्षांपूर्वी किंग्स्टनमधल्या ज्वेलरीच्या दुकानात कामासाठी रुजू झाला होता. ज्वेलर्सचे मालक रोज रात्री दुकानातील रोख रक्कम राकेशला घेऊन जाण्यास सांगायचे. ही माहिती हल्लेखोरांना मिळाल्याने तो घरी पोहोचताच हल्लेखोरांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला.
राकेशच्या हत्येमुळे तलरेजा कुटुंब हादरलं असून त्याचा मृतदेह वसईत आणण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. वसई-विरारच्या महापौर प्रविणा ठाकूर यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज्य यांच्याशी संपर्क साधून मृतदेह हस्तांतरणाचे सोपस्कार लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती केली. त्यानंतर जमैकाचे पंतप्रधान अॅण्ड्रीव्ह हॉलनेस यांनी तात्काळ जमैका प्रशासनाला पोस्टमार्टम आणि इतर सोपस्कार लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement