USA | भारतीय वंशाच्या प्रोनिता गुप्ता आणि चिराग बेन्स यांना बायडेन प्रशासनात स्थान, आतापर्यंत 55 भारतीयांना प्रमुख पद
जो बायडेन (Joe Biden) प्रशासनात भारतीयांचा दबदबा वाढताना दिसत असून आतापर्यत 55 भारतीयांना अमेरिकन प्रशासनात स्थान देण्यात आलं आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आपल्या प्रशासनात चिराग बेन्स आणि प्रोनिता गुप्ता या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांना स्थान दिलं आहे. त्यामुळे बायडेन प्रशासनात भारतीयांचा दबदबा दिसून येतोय. बायडेन प्रशासनात आतापर्यंत 55 भारतीय वंशाच्या लोकांना स्थान दिल्याचं दिसून आलंय.
व्हाईट हाऊस प्रशासनाने याबाबत एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये चिराग बेन्स यांना क्रिमिनल जस्टिससाठी राष्ट्राध्यक्षांचे विशेष सहाय्यक म्हणून नियुक्ती केली आहे आणि प्रोनिता गुप्ता यांना कामगारांच्या संबधित क्षेत्रासाठी राष्ट्राध्यक्षांचे विशेष सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याचसोबत अतिरिक्त 20 सदस्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. त्यामध्ये कोरोना रिस्पॉन्स टीम, वातावरण बदल धोरण, इंटरनल निती परिषद आणि राष्ट्रीय आर्थिक परिषद या क्षेत्रामध्ये काही सदस्यांची नियुक्ती केली आहे.
व्हाईट हाऊसने आपल्या निवेदनात सांगितलंय की, देशासमोरील असलेल्या संकटांचा सामना करण्यासाठी बायडेन प्रशासनाने योग्य व्यक्तींची नियुक्ती केली आहे. त्यामाध्यमातून बायडेन प्रशासन देशाच्या प्रगतीचा आलेख उंचावत ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे.
USA | पत्रकार जमाल खाशोगींचा मारेकरी सौदी अरबचा राजपूत्रच, अमेरिकेच्या अहवालात स्पष्ट
बायडेन प्रशासनात आतापर्यंत 55 भारतीय वंशाच्या नागरिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ओटावा येथे जन्मलेले बेन्स हे राष्ट्रीय सार्वजनिक नीती संघटना डेमोसमध्ये कायदेशीर रणनितींचे मार्गदर्शक आहेत. त्याआधी ते हॉवर्ड लॉ स्कूलमध्ये ओपन सोसायटी फाऊंडेशनमध्ये वरिष्ठ फेलो होते.
या आधी अमेरिकन राष्ट्रपती जो बायडेन यांनी त्यांच्या पर्सनल मॅनेजमेन्ट कार्यालयाच्या प्रमुखपदी भारतीय-अमेरिकन वंशाच्या किरण अहुजा यांची नियुक्ती केली होती. अशा प्रकारे अमेरिकन प्रशासनात उच्च स्थान प्राप्त करणाऱ्या किरण अहुजा या पहिल्याच भारतीय वंशाच्या व्यक्ती आहेत. अमेरिकेच्या पर्सनल मॅनेजमेन्ट कार्यालयामध्ये जवळपास 20 लाख कर्मचारी काम करतात. 49 वर्षीय किरण अहुजा यांनी 2015 ते 2017 सालापर्यंत अमेरिकेच्या personnel and management (OPM) कार्यालयात चीफ ऑफ स्टाफ म्हणूनही काम केलं आहे.