(Source: ECI/ABP News/ABP Majha)
VIDEO : ट्रम्प यांच्या हश मनी प्रकरणावर सुनावणी, कोर्टाबाहेर व्यक्तीने स्वत:ला पेटवलं
Donald Trump Hush Money Case Hearing : मॅक्सवेल अझारेलो नावाच्या फ्लोरिडातील रहिवाशाने 19 एप्रिल रोजी मॅनहॅटन न्यायालयाबाहेर स्वतःला पेटवून घेतलं.
Man Self Immolation : अमेरिकेचे (United States) माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची न्यायालयात सुनावणी सुरु असताना एका व्यक्तीने कोर्टाबाहेर स्वत:ला पेटवून दिलं. न्यूर्याकमध्ये (New York) ही घटना घडली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन कोर्टामध्ये (Manhattan Court) डोनाल्ड ट्रम्प यांच्या संबंधित हश मनी (Hush Money) हश मनी प्रकरणासंदर्भात सुनावणी सुरु होती. यावेळी कोर्टाबाहेर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमली होती. या घोळक्यात एका व्यक्तीने पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवून घेतलं.
ट्रम्प यांच्या हश मनी प्रकरणावर सुनावणी
हश मनी प्रकरणाच्या (Hush Money) सुनावणी दरम्यान, ही घटना घडली. यावेळी अनेक वृत्तवाहिन्या कोर्टाच्या बाहेरून लाईव्ह रिपोर्टिंग करत होत्या, त्यामुळे ही घटना अनेक चॅनेलच्या कॅमेऱ्याद्वारे चित्रित झाली. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती सुरुवातीला कोर्टाबाहेर पॅम्प्लेट वाटत होता, त्यानंतर त्याने कॅनमधील पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेतलं. याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मॅनहॅटन कोर्टाबाहेर व्यक्तीने स्वत:ला पेटवलं
मॅक्सवेल अझारेलो नावाच्या फ्लोरिडातील रहिवाशाने 19 एप्रिल रोजी मॅनहॅटन न्यायालयाबाहेर स्वतःला पेटवून घेतलं. या घटनेनंतर मॅक्सवेलला गंभीर अवस्थेत कॉर्नेल विद्यापीठाच्या बर्न युनिटमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ज्यावेळी त्या व्यक्तीने स्वत:ला पेटवून घेतलं, त्यावेळी कोर्टात माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या खटल्याची सुनावणी सुरू होती. यावेळी न्यायालयाबाहेर मोठ्या संख्येने मीडिया प्रतिनिधीही उपस्थित होते. या घटनेनंतर समोर आलेले व्हिडीओ फुटेज धक्कादायक आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ :
NOW - Man just set himself on fire outside of the Trump trial.https://t.co/5Lq4Rkcp8h
— Disclose.tv (@disclosetv) April 19, 2024
वृत्तवाहिन्यांनी मागितली माफी
कोर्टाबाहेर ही घटना घडली तेव्हा त्याचवेळी अनेक वृत्त वाहिन्यांचे कॅमेरे चालू होते. ट्रम्प यांच्या खटल्याचे कव्हरेज करण्यासाठी अनेक वृत्तवाहिन्या जमा झाल्या होत्या. मॅक्सवेल अझारेलो स्वत:ला पेट्रोल ओतून पेटवून देण्यापूर्वी पत्रके वाटत होता. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेदरम्यान, मीडिया कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी समस्या उद्भवली कारण त्या व्यक्तीने कॅमेरासमोर स्वत:ला आग लावली. मीडिया नैतिकतेच्या कारणास्तव जळत असलेल्या व्यक्तीचे व्हिडीओ फुटेज दाखवले जाऊ शकत नाही, त्यामुळे चुकून अनेक वृत्तवाहिन्यांकडून याचं घटनेचं थेट प्रक्षेपण झालं. त्यानंतप संबंधित टीव्ही चॅनल्सने माफी मागितली.
ट्रम्प हश मनी प्रकरणी सुनावणी
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका पॉर्न स्टारला गुप्त मदत केल्याच्या कथिक प्रकरणाच्या सुनावणीसाठी 12 ज्युरी आणि सहा पर्यायी सदस्यांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या सदस्यांची समिती शुक्रवारी निवडण्यात आली. वकिलांव्यतिरिक्त या समितीमध्ये विक्री व्यावसायिक, सॉफ्टवेअर इंजिनीअर आणि इंग्रजी शिक्षकांचा समावेश आहे. दरम्यान, मॅनहॅटन न्यायालयात ट्रम्प यांच्या या खटल्याची सुनावणी सुरू असताना एका व्यक्तीने न्यायालयाबाहेर स्वत:ला पेटवून घेतलं.