एक्स्प्लोर

US Helicopter Crash: ट्रेनिंगहून परतताना अमेरिकन सैन्याचे दोन हेलिकॉप्टर क्रॅश, कशी घडली दुर्घटना?

US Helicopter Crash: अद्याप या अपघाताचे कारण समजले नाही. याची चौकशी करण्यात येत आहे. चौकशीत अपघाताचे कारण समोर येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

US Helicopter Crash: अमेरिकेच्या (America) लष्कराच्या दोन हेलिकॉप्टरचा  गुरूवारी  हेलिकॉप्टरचा अपघात (Helicopter Crash) झाला.  अमेरिकन सैन्याचं दोन हेलिकॉप्टर  ट्रेनिंग पूर्ण करून परतताना हा अपघात झाला आहे. अमेरिकन सैन्याच्या हेलिकॉप्टरचा हा या वर्षातील तिसरा अपघात आहे. अमेरिकन सैन्याचे प्रवक्ते जॉन पेनेल यांनी दिलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टरमध्ये दोन व्यक्ती होत्या.

अमेरिकन समाचार एजन्सी असोसिएटेड प्रेसने दिलेल्या रिपोर्टनुसार जॉन पेनेल म्हणाले, घटनेशी संबधित कोणतीही माहतिती सध्या उपलब्ध नाही. अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. हेलिकॉप्टरमधील व्यक्तींच्या  प्रकृतीबाबत कोणतीही माहिती सध्या मिळालेली नाही.

अमेरिकन सैन्याने  दिलेल्या माहितीनुसार, Apache AH-64 हेलीकॉप्टर  फेअरबँक्स जवळील फोर्ट वेनराईटचे होते. या दुर्घनेचा तपास सुरू असून तपासानंतर अधिकची माहिती देण्यात येईल. एपी रिपोर्टनुसार, अलास्का स्टेट ट्रूपर्सचे प्रवक्ते ऑस्टिन मॅकडॅनियल म्हणाले, सरकारकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, अद्याप या अपघाताचे कारण समजले नाही. याची चौकशी करण्यात येत आहे. चौकशीत अपघाताचे कारण समोर येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मार्च महिन्यात झाली होती दुर्घटना

मार्च महिन्यात अमेरिकेच्या दोन लढाऊ ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. केंटकी परिसरात हा अपघात झाला होता. दोन हेलिकॉप्टरच्या धडकेत नऊ जवानांचा मृत्यू झाला होता. हेलिकॉप्टरला आग लागली होती.  अमेरिकन सैन्यावरही सध्या शोककळा पसरली होती 

फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अपघातात दोन जवान जखमी

फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अपघातात दोन जवान जखमी झाले होते. तालकीताना येथून उड्डाण केल्यानंतर अपाचे हेलिकॉप्टर कोसळले होते. हे हेलिकॉप्टर फोर्ट वेनराईटच्या एकोरेंजचे होते. 

भारतात पाच वर्षात तब्बल 15 दुर्घटना 

गेल्या काही दिवसात  हेलिकॉप्टर दुर्घनेमध्ये वाढ होताना दिसत आहे. अमेरिकेत या वर्षी तीन अपघातच्या घटना समोर आल्या आहेत. तर गेल्या गेल्या पाच वर्षात 15 हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ही माहिती 17 डिसेंबरला लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्य संरक्षणमंत्री अजय भट्ट यांनी दिली, 2017 ते 2021 या कालावधीत तब्बल 15 दुर्घटना झाल्या आहेत.  सर्वात मोठा अपघात हा भारतात गेल्या वर्षी झाला होता.  देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह 14 लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. ही दुर्घटना झाली कशी? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. याचा उच्चस्तरीय तपासही झाला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
Embed widget