(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona Vaccine | जॉन्सन अॅन्ड जॉन्सनच्या लसीच्या आपत्कालीन वापराला अमेरिकेत मंजूरी, लसीकरणाच्या कार्यक्रमाला येणार वेग
अमेरिकेच्या फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने (US FDA) जॉन्सन अॅन्ड जॉन्सनच्या (Johnson and Johnson) लसीच्या आपत्कालीन वापराला मंजूरी दिल्याने आता अमेरिकेतल्या लसीकरणाला वेग येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनीस्ट्रेशनने जॉन्सन अॅन्ड जॉन्सनच्या लसीच्या आपत्कालीन वापराला मंजूरी दिली आहे. या लसीने काही दिवसापूर्वीच तसा अर्ज केला होता. त्याला आता मंजूरी मिळाल्याने अमेरिकेच्या लसीकरणाच्या कार्यक्रमात आणखी एका लसीच्या वापराची भर पडणार आहे. या आधी अमेरिकेत दोन लसींच्या वापराला मंजूरी मिळाली होती.
जो बायडेन प्रशासनाने अमेरिकेतल्या लसीकरणाचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लसीच्या पुरवठ्यामध्ये वाढ होण्यासाठी जॉन्सन अॅन्ड जॉन्सनच्या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजूरी देण्यात आल्याचं समजतय. अमेरिकेतली फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनीस्ट्रेशन ही संस्था कोणत्याही लसीच्या वापराला परवानगी देण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावते. कोरोनाच्या लसीला परवानगी देताना ती लस सुरक्षित आहे का आणि किती प्रभावी आहे हे प्रामुख्याने पाहिलं जातं.
फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनीस्ट्रेशनच्या सल्लागार समितीने जॉन्सन अॅन्ड जॉन्सनच्या लसीच्या सिंगल शॉटच्या वापराला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लसीच्या केवळ एका डोसमुळे कोरोना पासून संरक्षण मिळतो असा दावा कंपनीने या आधीच केला होता. जानेवारी महिन्याच्या शेवटी या लसीच्या वापराला मंजूरी देण्यात यावी अशी मागणी कंपनीच्या वतीनं करण्यात आली होती. आता तशी मंजूरी मिळाल्याने अमेरिकेतल्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.
महानुभाव पंथाच्या आश्रमातील तब्बल 29 साधकांना कोरोनाची लागण
अमेरिकन लस निर्मीती कंपनी जॉन्सन अॅन्ड जॉन्सनने दावा केला होता की त्यांची लस ही अमेरिकेत 72 टक्के तर जगभरात 66 टक्के प्रभावी आहे. गंभीर आजारासंबंधी विचार केला तर या कंपनीची लस ही 85 टक्के प्रभावी असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला होता. यामध्ये एकूण 44 हजार लोकांवरती या लसीचा प्रयोग करण्यात आला आहे.
या कंपनीने स्पष्ट केलं आहे की लसीचा सिंगल डोस हा ट्रायलच्या दरम्यान 66 टक्के प्रभावी असल्याचं दिसून आलाय. या आधी जॉन्सन अॅन्ड जॉन्सन कंपनीने त्यांची लस ही 94 टक्के प्रभावी असल्याचं सांगितलं होतं. त्यावर बोलताना कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे की अमेरिकेत आणि आफ्रिकेच्या काही देशांत या लसीचा प्रभाव हा 72 टक्के आहे. तर गंभीर रुग्णांच्या बाबतीत या लसीचा प्रभाव हा 85 टक्के इतका आहे. यामध्ये एकाही व्यक्तीचा जीव गेला नसल्याचंही कंपनीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय.
या लसीचे वैशिष्ट्य म्हणजे याचा सिंगल डोस हा 66 टक्के प्रभावी असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे केवळ एक डोसमध्ये कोरोनापासून सुरक्षा मिळू शकते असा दावा कंपनीच्या वतीनं करण्यात आला आहे. दोन डोसच्या लसीइतकं प्रबळ नसले तरी याचा एक डोस हा आवश्यक ती सुरक्षा प्रदान करु शकतो असाही दावा कंपनीने केला आहे.
'एबीपी माझा'च्या बातमीनंतर पालिका खळबळून जागी; महापौर चषकावर पालिकेकडून गुन्हा दाखल