(Source: ECI/ABP News/ABP Majha)
US Elections Result: अजून 'या' राज्यांचे निकाल बाकी, आतापर्यंत ट्रम्प आणि बायडन कुठं-कुठं जिंकले
US Elections Result: अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यात चुरशीची लढत झाली आहे. आता बायडन विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. ट्रम्प आणि बायडन यांनी आतापर्यंत कोणकोणत्या राज्यांमध्ये विजय मिळवला आहे. जाणून घ्या...
US Elections Result: अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यात चुरशीची लढत झाली आहे. आता बायडन विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. बायडन बहुमताच्या अगदी जवळ पोहोचले असून त्यांना 264 इलेक्टोरल वोट मिळाले आहेत, त्यांना विजयासाठी केवळ 6 मतांची गरज आहे. तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर असून त्यांना आतापर्यंत 214 इलेक्टोरल वोट मिळाले आहेत. विजयासाठी उमेदवाराला 270 इलेक्टोरल मतांची गरज आहे. दुसरीकडे निवडणूक प्रक्रियेत घोटाळ्याचा आरोप करत डोनाल्ड ट्रम्प सुप्रीम कोर्टात पोहोचले असल्याची माहिती आहे. या राज्यांची मतगणना बाकी अमेरिकेत एकूण 50 राज्य आहेत. यापैकी आतापर्यंत 22 राज्यांमध्ये ट्रम्प यांनी तर 20 राज्यांमध्ये बायडन यांनी विजय मिळवला आहे.तर आठ राज्यांचा निकाल येणं अद्याप बाकी आहे. यात तीन सीट असेलेलं अलास्का, 11 सीट असलेलं एरिजोना, 16 सीट असलेलं जॉर्जिया, चार सीट असलेलं मेन, पाच सीट असलेलं नेबरास्का, सहा जागा असलेलं नेवाडा, 15 सीट असलेलं नॉर्थ कॅरोलीना आणि 20 सीट असलेलं पेनसिलवेनिया या राज्यांचा निकाल येणं बाकी आहे. या राज्यांमध्ये एकूण 77 इलेक्टोरल वोट्स आहेत. या मतांवर आता ट्रम्प आणि बायडन यांचं भवितव्य अवलंबून आहे. या राज्यांमध्ये जिंकले ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प यांनी इदाहो, लोवा, फ्लोरिडा, साउथ डकोटा, मिसौरी, लुइसियाना, नेब्रास्का, नॉर्थ डकोटा, अरकांसस, अलबामा, मिसिसिपी, मोनटाना, ओहियो, ओक्लाहोमा, टेनेसी, केंटकी, वेस्ट वर्जीनिया, व्योमिंग, टेक्सास, साउथ कॅरोलिना, इंडियाना, उताह आणि वियोमिंग मध्ये आतापर्यंत विजय मिळवला आहे. बायडन यांनी या राज्यांमध्ये विजय मिळवला बायडन यांनी वेस्ट वर्जीनिया, वॉशिंगटन कॅलिफोर्निया, कोलोराडो, न्यू हॅम्पशायर, डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया, न्यूयॉर्क, न्यू मॅक्सिको, वर्मोंट, कनेक्टिकट, डेलावेयर, इलिनोइस, मैरीलँड, मैसाचुसेट्स, न्यू जर्सी, टेनेसी ओरेगन, विस्कॉन्सिन, रोड आयलँड, वरमोंट, हवाई, मिशिगन, मिनेसोटा आणि रोड आयलँडमध्ये आतापर्यंत विजय मिळवला आहे.
प्रक्रियेवर आणि एकमेकांवर विश्वास ठेवा, आपण जिंकू- बायडन अध्यक्षपदाच्या निवडणुकी जो बाइडन विजयाच्या जवळ पोहोचले आहेत. त्यामुळे आता त्यांना आपल्या विजयाबाबत खात्री असल्याचं दिसत आहे. त्यांनी आज पहाटे साडेपाचच्या सुमारास केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "या प्रक्रियेवर आणि एकमेकांवर विश्वास ठेवा, आपण जिंकू." बायडन म्हणाले की, चित्र आता स्पष्ट आहे, आपण चांगल्या मतांनी जिंकत असल्याचे दिसत आहे. जेव्हा मतगणना थांबेल तेव्हा आपणच विजेता असणार आहोत. ते म्हणाले हा विजय केवळ माझा किंवा आपला नसेल तर हा विजय प्रत्येक अमेरिकी नागरिकांचा असेल.
मिशिगन आणि पेंसिल्वेनियामधील मतगणनेविरोधात कोर्टात जाण्याच्या निर्णयावर ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, आपल्या वकीलांनी याबाबत चर्चा केली आहे. मात्र ही बाब चांगली नाही. आपली व्यवस्था आणि राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला आधीच खूप नुकसान पोहोचवण्यात आलं आहे, यावर चर्चा झाली पाहिजे, असं ते म्हणाले.
ट्रम्प यांचा निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप, ट्रम्प कोर्टात अमेरिकन राष्ट्रपती निवडणुकीची लढाई आता कोर्टात पोहोचली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीमने मिशिगन मधील पोस्टल बॅलेटची मतगणना थांबवल्याबद्दल केस दाखल केली आहे. ट्रम्प यांनी मतगणनेत घोटाळ्याचा आरोप करत कोर्टात जाण्याचा इशारा आधीच दिला होता. दुसरीकडे जो बायडन यांनी म्हटलं आहे की, जर ट्रम्प मतगणना थांबवण्याचा प्रयत्न करत कोर्टात जातील तर आमच्याकडेही कायदेशीर विरोध करण्यासाठी टीम सज्ज आहेत.
माहितीनुसार, मिशिगनमध्ये आतापर्यंत 96 टक्के मतगणना पूर्ण झाली आहे. इथं बायडन यांना 25,71,602 (49.4%) मतं मिळाली आहेत. तर ट्रम्प यांना 25, 56,469 (49.1%) मत मिळालीत. दोन्ही उमेदवारांच्या मतांमध्ये काहीच मतांचं अंतर आहे. मिशिगनमध्ये 16 इलेक्टोरल मतं आहेत.
पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या विजयाचा दावा केला होता. तसंच ट्रम्प यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचाही आरोप केला होता. ते म्हणाले की, पुढील मतदान थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. ट्रम्प यांनी जो बायडेन आणि डेमोक्रॅटसवर निवडणुकीत घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. आपण या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. आम्ही जिंकण्याच्या उत्सवाची तयारी करत आहोत, आम्ही सगळं जिंकणार आहोत. निवडणुकीचा निकाल आश्चर्यकारक असेल, आणि अपेक्षेप्रमाणे आपण जिंकू, असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. त्यांनी बायडन यांच्यावर मतांच्या गणनेत घोटाळ्य़ाचा आरोप केला होता. पेंसिल्वेनिया मध्ये रात्रभर मतगणना का होत आहे? असा सवाल त्यांनी केला होता.
आपल्याला जिंकण्याचा पूर्ण विश्वास - बायडन इलेक्टोरल मतगणनेत बायडन आतापर्यंत तरी आघाडीवर आहेत. दरम्यान बायडन यांनी देशाला संबोधित करत जिंकण्याबाबतचा दावा केला आहे. बायडन काल म्हणाले होते की, आपल्याला जिंकण्याचा पूर्ण विश्वास आहे. आपण वाट पाहू. आपण ऐरिजोना आणि मैनिसोटा सह अनेक राज्यांमध्ये विजय मिळवला आहे. बायडन म्हणाले की, निवडणूक तोवर संपणार नाही जोवर एक एक बॅलेटची मोजणी होणार नाही. मी किंवा ट्रम्प कुणीही जिंकण्याबाबत घोषणा करु शकत नाही. ते अमेरिकन जनता ठरवेल.
विक्रमी मतदान अमेरिकेत यंदा राष्टपदीपदासाठी विक्रमी मतदान झालं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेतील ओरेगन हे पाचवं राज्य आहे, जिथं 2016 च्या निवडणुकीपेक्षा अधिक मतदान झालं आहे. यावेळी 10 कोटी अमेरिकन नागरिकांनी निवडणुकीआधीच पोस्टल मतदानाद्वारे आपलं मतदान केलं होतं. यामुळं यंदा विक्रमी मतदान झालं असल्याचा अंदाज आहे. रिपब्लिकनचे उमेदवार डोनाल्ड ट्रंप दुसऱ्यांदा जिंकणार की डेमोक्रेटचे उमेदवार जो बायडन बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अमेरिकेतील सर्व 50 राज्यांमध्ये सोबतच निवडणूक पार पडली.
संबंधित बातम्या
US Elections: 'माझ्यासाठी जिंकणं सोपं, हार पचवणं कठिण', मतदानादरम्यान ट्रम्प यांचं ट्वीट
US Election Results LIVE | बायडन 270 च्या जादुई आकड्याजवळ पोहोचले, ट्रम्प अद्याप मागे