एक्स्प्लोर

US Elections : अमेरिकन राष्ट्रपतीपदाची निवडणूक रोमांचक टप्प्यावर! निकाल लांबणीवर, मतगणनेत घोटाळ्याचा आरोप

US Elections Result : अमेरिकन राष्ट्रपतीपदाची निवडणूक रोमांचक टप्प्यावर आहे. निवडणुकीचा अंतिम निकाल यायला वेळ लागणार असला तरी हा मुकाबला आता रोमांचक होत आहे. बायडन यांना आतापर्यंत 236 आणि डोनाल्ड ट्रंप यांना आतापर्यंत 213 इलेक्टोरल मतं मिळाली आहेत.

US Elections Result:  अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक रंजक टप्प्यावर आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिकचे उमेदवार जो बायडन यांच्यात अटी-तटीचा सामना सुरु आहे. दरम्यान मतमोजणी सुरु असताना डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांनी पत्रकार परिषद घेत एकमेकांवर आरोप करत कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. सध्या पेंसिल्वेनिया मध्ये मतगणना थांबवण्यात आली आहे. तिथं आता उद्या मतगणना होणार आहे. त्यामुळं अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या अंतिम निकालासाठी आता वाट पाहावी लागणार आहे. डोनाल्ड ट्रंप यांनी मतगणनेबाबत घोटाळ्याचा आरोप करत सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे, तर बायडन यांनी देखील कोर्टात जाण्याबाबत भाष्य केलं आहे.

ट्रम्प यांचा निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या विजयाचा दावा केला. तसंच ट्रम्प यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचाही आरोप केला. ते म्हणाले की, पुढील मतदान थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. ट्रम्प यांनी जो बायडेन आणि डेमोक्रॅटसवर निवडणुकीत घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. आपण या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. आपण जिंकणारच होतो, म्हणजे आपण जिंकलोच आहोत, असे ट्रम्प व्हाईट हाऊसमधल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.

डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकी नागरिकांचे आभार मानले आहेत. आम्ही जिंकण्याच्या उत्सवाची तयारी करत आहोत, आम्ही सगळं जिंकणार आहोत. निवडणुकीचा निकाल आश्चर्यकारक असेल, आणि अपेक्षेप्रमाणे आपण जिंकू, असं ट्रम्प यांनी म्हटलं. त्यांनी बायडन यांच्यावर मतांच्या गणनेत घोटाळ्य़ाचा आरोप केला आहे.  पेंसिल्वेनिया मध्ये रात्रभर मतगणना का होत आहे? असा सवाल त्यांनी केला आहे.  अमेरिकेच्या लोकांना धन्यवाद देत ट्रम्प यांनी ट्वीट केलं होतं की, आम्ही संपूर्ण देशात चांगल्या स्थितीत आहोत. अमेरिकत वोटिंग सुरु आहे. सर्वांनी मतदान करावं. माझ्यासाठी जिंकणं सोपं आहे मात्र हार पचवणं कठिण आहे, असं त्यांनी म्हटलंय. आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करत दावा केला होता की, त्यांच्या सरकारच्या काळात अमेरिकेची अर्थव्यवस्था 33.1 टक्क्यांनी सर्वात वेगाने वाढली आहे. ते म्हणाले की, अमेरिकेच्या इतिहासात पुढील वर्ष सर्वात महान इकॉनॉमी वर्ष असेल.

US Elections 2020 : इलेक्टोरल वोटिंगमध्ये बायडन आघाडीवर, तर आतापर्यंत 22 पैकी 12 राज्यात ट्रम्प जिंकले

आपल्याला जिंकण्याचा पूर्ण विश्वास - बायडन इलेक्टोरल मतगणनेत बायडन आतापर्यंत तरी आघाडीवर आहेत. दरम्यान बायडन यांनी देशाला संबोधित करत जिंकण्याबाबतचा दावा केला आहे.  बायडन म्हणाले की, आपल्याला जिंकण्याचा पूर्ण विश्वास आहे. आपण वाट पाहू. आपण  ऐरिजोना आणि मैनिसोटा सह अनेक राज्यांमध्ये विजय मिळवला आहे. बायडन म्हणाले की, निवडणूक तोवर संपणार नाही जोवर एक एक बॅलेटची मोजणी होणार नाही. मी किंवा ट्रम्प कुणीही जिंकण्याबाबत घोषणा करु शकत नाही. ते अमेरिकन जनता ठरवेल.

 राष्ट्रपतीपदाची निवडणूक रोमांचक टप्प्यावर अमेरिकन राष्ट्रपतीपदाची निवडणूक रोमांचक टप्प्यावर आहे. निवडणुकीचा अंतिम निकाल यायला वेळ लागणार असला तरी हा मुकाबला आता रोमांचक होत आहे. बायडन यांना आतापर्यंत 236 आणि डोनाल्ड ट्रंप यांना आतापर्यंत 213 इलेक्टोरल मतं मिळाली आहेत.

विक्रमी मतदान अमेरिकेत यंदा राष्टपदीपदासाठी विक्रमी मतदान झालं आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेतील ओरेगन हे पाचवं राज्य आहे, जिथं 2016 च्या निवडणुकीपेक्षा अधिक मतदान झालं आहे. यावेळी 10 कोटी अमेरिकन नागरिकांनी निवडणुकीआधीच पोस्टल मतदानाद्वारे आपलं मतदान केलं होतं. यामुळं यंदा विक्रमी मतदान झालं असल्याचा अंदाज आहे. रिपब्लिकनचे उमेदवार डोनाल्ड ट्रंप दुसऱ्यांदा जिंकणार की डेमोक्रेटचे उमेदवार जो बायडन बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अमेरिकेतील सर्व 50 राज्‍यांमध्ये सोबतच निवडणूक पार पडली.

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
Pakistan News: पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Embed widget