एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

US Elections | डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर हार मानली, सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु करण्यास मंजुरी

US Elections | अमेरिकन अध्यक्षपदाच्या हस्तांतरण प्रक्रियेला सुरुवात झाली असून त्यास ट्रम्प मंजुरी देतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर ट्रम्प यांनी त्यास मंजुरी दिली आहे. प्रशासनाने जो बायडन यांना सत्ता हस्तांतरणाच्या प्रक्रियेमध्ये सामिल होण्याचे आमंत्रण दिलंय.

वॉशिग्टन: नुकत्याच झालेल्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या जो बायडन यांची अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. पराभूत उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा पराभव अमान्य करुन पद सोडण्यास नकार दिला होता. तसेच निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचं सांगून त्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. आता मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु करण्यास मंजुरी दिली आहे.

अमेरिकन निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तीन आठवडे झाले तरी ट्रम्प आपल्या निश्चयावर ठाम होते. यादरम्यान त्यांनी जो बायडन यांच्यावर अनेकवेळा टीका केली. आता सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु झाली असल्याने त्याला डोनाल्ड ट्रम्प मंजुरी देतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

जो बायडन यांना आमंत्रण डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या जनरल सर्व्हिस ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनला सत्ता हस्तांतरण प्रक्रिया सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की प्रक्रियानुसार जे काही करणे आवश्यक आहे ते केले पाहिजे. त्यानंतर जनरल सर्व्हिस ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनचे प्रमुखांनी जो बायडन यांना पत्र लिहून त्यांना सत्ता हस्तांतरणाच्या प्रक्रियेमध्ये सामिल होण्याचे आमंत्रण दिले आहे. विश्लेषकांच्या मते, सत्ता हस्तांतरणाच्या प्रक्रियेला मान्यता देऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी अप्रत्यक्षपणे आपला पराभव मान्य करण्याचे संकेत दिले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अजूनही त्यांचा पराभव मान्य केला नाही. या दरम्यान त्यांनी जे काही शक्य आहे ते सर्व करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली, अधिकाऱ्यांवर अनेक प्रकारे दबाब आणण्याचा प्रयत्न केला. निकालानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, "जे नियमानुसार आहे ते केले पाहिजे, परंतु याचा अर्थ असा नाही की जो बायडन यांचा विजय आम्ही मान्य केलाय. मी त्यांचे अभिनंदनही करणार नाही कारण निवडणुकीतील या निकालाला आम्ही न्यायालयात आव्हान दिले आहे."

या सत्ता हस्तांतरणांमुळे आता निर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांच्या टीमला व्हाईट हाऊसमधील अनेक महत्वाच्या गोष्टींचा अधिकार प्राप्त होणार आहे. निर्वाचित उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनी या अगोदरच संरक्षणासंबंधीच्या नियमित बैठकांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis CM? | संघाची फडणवीसांना पसंती असू शकते का? Special ReportMahayuti Ladki bahin Yojana | महायुतीसाठी लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर! Special ReportMNS Raj Thackeray Vidhan Sabha | मतांची अट, मनसेची मान्यता का रद्द होणार? Special ReportDevendra Fadanvis CM?|खुर्ची एक दावेदार अनेक,अजितदादांचा वादा शिंदेंना की फडणवीसांना? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Embed widget