(Source: ECI/ABP News/ABP Majha)
US Election 2020 | डेमोक्रॅटिक पक्षाच्या जॉर्जियातील विजयानंतर ट्रम्प यांचे पराभव स्विकारण्याचे संकेत; म्हणाले...
भविष्यातील प्रशासन कोणते असेल याचे उत्तर काळच देईल अशा प्रकारचे वक्तव्य ट्रम्प यांनी केले. अमेरिकेत सातत्याने कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत असतानाही देशव्यापी लॉकडाऊन लावणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय.
न्यूयॉर्क: अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीतील त्यांचा पराभव स्वीकार करण्याचे संकेत दिले आहेत. ज्या जॉर्जियात अजूनपर्यंत मतमोजणी सुरु होती. तिथेही जो बायडय यांचा विजय झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत निवडणुकीतील त्यांचा पराभव मान्य करण्यास नकार दिला होता तसेच त्यांनी या निवडणुकीतील निकालास न्यायालयात आव्हान देण्याची भाषा केली होती. कोरोना व्हायरस संबंधित ब्रिफिंग दरम्यान ते म्हणाले की, "कोणालाच माहीत नाही की, पुढचे प्रशासन कोणाचे असेल. भविष्यात जे काही होईल ते येणारा काळच ठरवेल."
अमेरिकेत 20 जानेवारी ही नियोजित सत्तांतराची तारीख ठरलेली आहे. निवडणुकीतील निकालानंतर या विषयावर बोलण्याची ट्रम्प यांची ही पहिलीच वेळ आहे. त्यावरुन असा अंदाज लावण्यात येतोय की, ट्रम्प आता त्यांचा पराभव मान्य करतील. त्यांच्यासोबत काम केलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनेही अशाच प्रकारचे वक्तव्य केले आहे.
अमेरिकेचा कोरोना रुग्णांच्या संख्येत जगात पहिला क्रमांक लागतोय. सातत्याने वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येमुळे त्या देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याची शक्यता वर्तववली जात आहे. अशाही परिस्थितीत ट्रम्प यांनी देशव्यापी लॉकडाऊन लावण्यास नकार दिला आहे. तसेच त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत.
पाहा व्हिडीओ : जो बायडन अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष
अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या अमेरिका राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. माध्यमांच्या वृत्तानुसार, बायडन यांना 306 इलेक्टोरल कॉलेज व्होट मिळाले आहेत तर ट्रम्प यांना 232 इलेक्टोरल कॉलेज व्होट मिळाले आहेत. जिंकण्यासाठी 270 इलेक्टोरल कॉलेज व्होट आवश्यक असतात. या आवश्यक इलेक्टोरल कॉलेज व्होटचा टप्पा पार केल्यानंतर जो बायडेन यांना अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जाहीर करण्यात आलं आहे. डेमॉक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन आता अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष होणार आहेत.
ट्रम्प यांनी अमेरिकन निवडणुकीत मतमोजणीत घोटाळा झाल्याचा आरोप केला होता आणि त्याविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय जाहीर केला होता. अमेरिकेतील वेगवेगळ्या भागांत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर वेगवगेळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काही ठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे. तर काही ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- सासरेबुवा आता पराभव मान्य करा; जावई कूश्नर यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना सल्ला
- 'गजनी बायडन' म्हणत कंगनाकडून अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षांवर टीका; कमला हॅरिस यांचं मात्र समर्थन
- विजयानंतर जो बायडन, कमला हॅरिस यांना पंतप्रधान मोदींच्या खास शुभेच्छा, म्हणाले...
- फेसबुक आणि ट्विटरच्या 'फॅक्ट चेक लेबल' मुळे अमेरिकेत निवडणुकीतील अफवांना बसला आळा, ट्रम्प यांचे अनेक मेसेज केले ब्लॉक