एक्स्प्लोर

US Elections Result: उर्वरित पाचपैकी चार राज्यांमध्ये बायडन आघाडीवर, ट्रम्प यांचा रस्ता कठिण

US Elections Result: अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यातील लढत आता स्पष्ट होत आहे. बायडन यांनी उर्वरित पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये आघाडी घेतली आहे. तर ट्रम्प यांनी केवळ एका राज्यात आघाडी घेतलीय.

US Elections Result: अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यातील लढत आता स्पष्ट होत आहे. आता बायडन विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत, मात्र ट्रम्प मतगणनेच्या विरोधात कोर्टात गेल्यानं अंतिम निकाल येण्यासाठी वेळ लागत आहे. दरम्यान आता बायडन यांनी मतगणना न झालेल्या उर्वरित पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये आघाडी घेतली आहे. तर ट्रम्प यांनी केवळ एका राज्यात आघाडी घेतलीय. पेंसिलवेनिया, नेवाडा, जॉर्जिया आणि एरिजोना मध्ये बायडन आघाडीवर असल्याची माहिती आहे.  जॉर्जिया हा रिपब्लिकनचा गड मानला जातो.  जॉर्जिया राज्याच ट्रम्प आणि बायडन यांच्या मतांमधील अंतर चांगलेच वाढले आहे. बायडन आता 4184 मतांनी आघाडीवर आहेत. तर बायडन पेंसिलवेनिया, नेवाडा आणि एरिजोनामधून देखील अनुक्रमे  14541, 20137, 39400 मतांनी आघाडीवर आहेत. यामुळं आता ट्रम्प यांचा विजयाचा रस्ता आणखी कठिण झाला आहे.

अमेरिकेचे हाउस स्पीकर आणि काँग्रेसचे टॉप डेमोक्रेट नॅन्सी पेलोसी यांनी जो बायडन यांना अमेरिकेचे  "प्रेसिडेंट इलेक्ट " असं म्हटलं आहे. पेलोसी यांनी म्हटलं की, बायडन आणि कमला हॅरिस विजयाच्या जवळ आहेत. तर ट्रम्प यांचे निवडणूक अभियान अधिकारी मॅट मॉर्गन यांनी म्हटलंय की, निवडणूक अजून संपलेली नाही. बायडन स्वत:ला चार राज्यांच्या आघाडीच्या जोरावर विजेता झाल्याचं सांगत आहेत. मात्र फायनल निकाल अद्याप बाकी आहे.  जॉर्जियामध्ये दुसऱ्यांदा वोटिंग होईल, आम्हाला विश्वास आहे की, राष्ट्रपती ट्रम्प नक्की बाजी मारतील.  राष्ट्रपती ट्रम्प यांनी म्हटलंय की, मी या चारही राज्यात काल रात्रीपर्यंत आघाडीवर होतो. आता आश्चर्यकारक पद्धतीनं आघाडी गेली. आमची कायदेशीर लढाई सुरु आहे. आम्ही पुन्हा आघाडी मिळवू, असं ट्रम्प म्हणाले.

जो बायडन अमेरिकेचे राष्ट्रपती झाले तर भारतावर काय परिणाम होणार?

रिपब्लिकन नॅशनल कमिटी गोळा करणार 60 मिलियन डॉलर या निवडणुकीच्या कायदेशीर लढाईसाठी रिपब्लिकन नॅशनल कमिटी जवळपास 60 मिलियन डॉलर गोळा करणार असल्याची माहिती आहे. ट्रम्प यांच्या टीमनं टीम मिशिगन, पेंसिलवेनिया, जॉर्जिया आणि नवादामध्ये केसेस दाखल केल्या आहेत. तर  विस्कॉन्सिनमध्ये मतगणना पुन्हा करण्याची मागणी केली आहे. दरम्यान राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने दाखल केलेल्या मिशिगन आणि जॉर्जियामधील केसेस कोर्टाने काल फेटाळल्या आहेत. ट्रम्प यांनी या दोन्ही राज्यांमधील पोस्टल बॅलेट मतगणना थांबवण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी कोर्टाने फेटाळली आहे. दुसरीकडे जो बायडन यांनी देखील आपल्या समर्थकांकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. कायद्याच्या लढाईमध्ये मदतीसाठी बायडन यांनी आवाहन केलं आहे.

US Election: राष्ट्रपती ट्रम्प यांना धक्का, मिशिगन-जॉर्जियामधील केसेस कोर्टानं फेटाळल्या

बायडन बहुमताच्या अगदी जवळ पोहोचले 

बायडन बहुमताच्या अगदी जवळ पोहोचले असून त्यांना 264  इलेक्टोरल वोट मिळाले आहेत, त्यांना विजयासाठी केवळ 6 मतांची गरज आहे. तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर असून त्यांना आतापर्यंत 214 इलेक्टोरल वोट मिळाले आहेत. विजयासाठी उमेदवाराला 270 इलेक्टोरल मतांची गरज आहे. दुसरीकडे निवडणूक प्रक्रियेत घोटाळ्याचा आरोप करत डोनाल्ड ट्रम्प सुप्रीम कोर्टात पोहोचले. मतगणनेत घोटाळ्याचा आरोप करत ट्रम्प समर्थकांनी एकीकडे गोंधळ घालायला सुरुवात केली आहे तर दुसरीकडे काही राज्यांमध्ये निकालाविरोधात केसेस करण्यात आल्या आहेत. यामुळं अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा अंतिम निकाल हाती यायला वेळ लागणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. दुसरीकडे जो बायडन यांनी आपल्या समर्थकांकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. कायद्याच्या लढाईमध्ये मदतीसाठी बायडन यांनी आवाहन केलं आहे.

अमेरिकेच्या निवडणुकीत मराठमोळ्या उद्योजकाचा डंका, मिशिगनमधून श्री ठाणेदार झाले आमदार

ट्रम्प यांच्या टीमने आज जॉर्जिया, मिशिगन आणि पेन्सिलवेनिया मध्ये केसेस दाखल केल्या आहेत. तसेच  विस्कोंन्सिन मध्ये पुन्हा मतगणना करण्याची मागणी केली आहे.  डोनाल्ड ट्रंप यांनी ‘बॅटलग्राउंड’ राज्य पेन्सिलवेनिया, मिशिगन, नॉर्थ कॅरोलाइना आणि जॉर्जियामध्ये आपल्या विजयाची घोषणा केली आहे.

बायडन यांना 50.5 टक्के मतं सीएनएन न्यूजच्या ताज्या आकडेवारीनुसार जो बायडन यांना 50.5 टक्के मतं मिळाली आहेत तर  डोनाल्ड ट्रंप यांना 48 टक्के मतं मिळाली आहेत. बायडन यांना आतापर्यंत 7 कोटी 15 लाख 97 हजार 485 मतं मिळाली आहेत. तर ट्रम्प यांना 6 कोटी 80 लाख 35 हजार 427 मत मिळाली आहेत.  जो बायडन हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले असे राष्ट्रपती पदाचे उमेदवार बनले आहेत. ज्यांना सर्वाधिक मतं मिळाली आहेत. त्यांनी ओबामा यांचाही रेकॉर्ड मोडीत काढला आहे. अमेरिकेतील निवडणुकांमध्ये 2008 साली ओबामा यांना 69,498,516 मतं मिळाली होती. ओबामा यांच्या कार्यकाळात उपराष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या बायडन यांना आतापर्यंत 69,589,840 मतं मिळाली होती. अद्याप लाखो मतांची मोजणी करणं बाकी आहे.

पॉप्युलर मतांमध्ये ट्रम्प यांना टाकलं मागे

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना आतापर्यंत 66,706,923 मतं मिळाली आहेत. लाखो मतांची मोजणी अद्याप बाकी आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पही ओबामांचा रेकॉर्ड मोडू शकतात. दरम्यान, अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये पॉप्युलर मतं मिळवणाराच उमेदवार राष्ट्रपती पदी विराजमान होतो, असं नाही. निवडणूकांमध्ये विजय मिळवण्यासाठी 270 किंवा त्याहून अधिक इलेक्ट्रोल मतं मिळवणं आवश्यक असतं. आतापर्यंत बायडन यांना 264 मतं मिळाली आहेत, तर ट्रम्प यांच्या खात्यात 214 इलेक्ट्रोरल मतं आहेत.

या राज्यांची मतगणना बाकी

अमेरिकेत एकूण 50 राज्य आहेत. यापैकी आतापर्यंत 22 राज्यांमध्ये ट्रम्प यांनी तर 20 राज्यांमध्ये बायडन यांनी विजय मिळवला आहे.तर पाच राज्यांचा निकाल येणं अद्याप बाकी आहे.  11 सीट असलेलं एरिजोना, 16 सीट असलेलं जॉर्जिया,  सहा जागा असलेलं  नेवाडा, 15 सीट असलेलं नॉर्थ कॅरोलीना आणि 20 सीट असलेलं पेनसिलवेनिया या राज्यांचा निकाल येणं बाकी आहे. या राज्यांमध्ये एकूण 77 इलेक्टोरल वोट्स आहेत. या मतांवर आता ट्रम्प आणि बायडन यांचं भवितव्य अवलंबून आहे.

या राज्यांमध्ये जिंकले ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांनी इदाहो, लोवा, फ्लोरिडा, साउथ डकोटा, मिसौरी, लुइसियाना, नेब्रास्का, नॉर्थ डकोटा, अरकांसस, अलबामा, मिसिसिपी, मोनटाना, ओहियो, ओक्लाहोमा, टेनेसी, केंटकी, वेस्ट वर्जीनिया, व्योमिंग, टेक्सास, साउथ कॅरोलिना, इंडियाना, उताह आणि वियोमिंग मध्ये आतापर्यंत विजय मिळवला आहे.

बायडन यांनी या राज्यांमध्ये विजय मिळवला

बायडन यांनी वेस्ट वर्जीनिया, वॉशिंगटन कॅलिफोर्निया, कोलोराडो, न्यू हॅम्पशायर, डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया, न्यूयॉर्क, न्यू मॅक्सिको, वर्मोंट, कनेक्टिकट, डेलावेयर, इलिनोइस, मैरीलँड, मैसाचुसेट्स, न्यू जर्सी, टेनेसी ओरेगन, विस्कॉन्सिन, रोड आयलँड, वरमोंट, हवाई, मिशिगन, मिनेसोटा आणि रोड आयलँडमध्ये आतापर्यंत विजय मिळवला आहे.

संबंधित बातम्या

US Elections : अमेरिकन राष्ट्रपतीपदाची निवडणूक रोमांचक टप्प्यावर! निकाल लांबणीवर, मतगणनेत घोटाळ्याचा आरोप

US Elections: 'माझ्यासाठी जिंकणं सोपं, हार पचवणं कठिण', मतदानादरम्यान ट्रम्प यांचं ट्वीट

US Election Results LIVE | बायडन 270 च्या जादुई आकड्याजवळ पोहोचले, ट्रम्प अद्याप मागे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget