एक्स्प्लोर

अमेरिकेच्या निवडणुकीत मराठमोळ्या उद्योजकाचा डंका, मिशिगनमधून श्री ठाणेदार झाले आमदार

US Election Result 2020 : अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये रोमांच शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीच्या धामधुमीत एका मराठमोळ्या नावाचा डंका अमेरिकेत वाजला आहे. श्री ठाणेदार यांनी मिशिगन राज्यातून शानदार विजय मिळवत आमदारकी मिळवली आहे.

US Election 2020 : अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये रोमांच शिगेला पोहोचला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये  डेमोक्रिटिकचे उमेदवार जो बायडन विजयाच्या जवळ पोहोचले आहेत. या निवडणुकीच्या धामधुमीत एका मराठमोळ्या नावाचा डंका अमेरिकेत वाजला आहे. श्री ठाणेदार यांनी मिशिगन राज्यातून शानदार विजय मिळवत आमदारकी मिळवली आहे. श्री ठाणेदार मिशिगन यांनी राज्यातून यावर्षी 'हाऊस ऑफ रिप्रझेंटेटिव्ह' म्हणजेच विधानसभेची निवडणूक लढवली. त्यांचं एक यशस्वी उद्योजक - 'ही श्रीची इच्छा' प्रसिध्द आत्मचरित्र आहे. आजपर्यंत डेमोक्रॅटिक पक्षाचे मोठे देणगीदार असलेले श्री ठाणेदार आता पक्षाचे लोकनियुक्त प्रतिनिधी झाले आहेत.

24 व्या वर्षी मी अमेरिकेत गेलेल्या ठाणेदार यांनी आपला झेंडा अमेरिकन राजकारणात रोवला आहे. त्यांनी 25 हजार मतांनी विजय मिळवला आहे. त्यांना 93 टक्के मतं मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवाराला केवळ 6 टक्के मतं मिळाली. त्यांनी 2018 मध्ये राज्याच्या गव्हर्नरपदासाठी त्यांनी निवडणूक लढवली होती, तेव्हा त्यांना दोन लाखांहून जास्त मतं मिळाली होती. आत्ताच्या निवडणुकीत त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता.

प्रत्यक्ष राजकारणात उतरणं आवश्यक, ठाणेदार यांचा एबीपी माझाशी खास संवाद

निवडणुकीत विजय मिळवलेल्या ठाणेदार यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, निवडणुकीचा हा अनुभव खूप चांगला होता. 24 व्या वर्षी मी अमेरिकेत आलो. लोकांना आपल्यासारखा दिसणारा बोलणारा नेता हवा असतो. त्यामुळं मला खूप काम करावं लागलं. लोकांना घरोघरी जावून समजवावं लागलं. 25 हजार मतांनी मी जिंकलो. 93 टक्के मतं मला मिळाली. प्रतिस्पर्धी उमेदवाराला केवळ 6 टक्के मतं मिळाली, असं त्यांनी सांगितलं.

ठाणेदार म्हणाले की, मी कोविड येण्याआधी प्रचाराला सुरुवात केली आहे. दोन वर्षापूर्वी मिशीगन गव्हर्नरसाठी उभा होतो. आता मी आमदार म्हणून मी निवडून आलो आहे. राजकारणात प्रत्यक्ष उतरणं आवश्यक आहे. बाहेर बसून नावं ठेवण्यात अर्थ नाही. प्रत्यक्ष तिथं जाऊन प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. मला या देशानं खूप काही दिलंय, त्यामुळं मी त्यांचं देणं लागतो, मला खूप काम करायचं आहे, असं ठाणेदार म्हणाले.

त्यांनी सांगितलं की, मुख्य निवडणुकीचं तिकिट मिळवण्यासाठी  आधी पक्षांतर्गत निवडणूक होते. त्यातून विजयी होणाऱ्याला तिकिट मिळतं. मला प्रायमरीमध्ये डेमोक्रेटिक पक्षानं निवडून दिलं. मला शिक्षण, रस्ते, उद्योगांवर काम करणार आहे. गरीबांसाठी काम करायचं आहे, असं ते म्हणाले.

ट्रम्प यांच्या कोर्टात जाण्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, निवडणुकीत जो बायडन आणि डेमोक्रेटिक पक्ष निवडून येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. ट्रम्प यांना पराभव स्वीकारायचा नाहीय, त्यामुळं ते आता कोर्टात गेले आहेत. बायडन हेच अमेरिकेचे राष्ट्रपती होतील, असं ठाणेदार म्हणाले. ट्रम्प यांना असं करण्याची सवय आहे. कोर्टात गेले तरी काही फरक पडणार नाही, न्यायालयीन पद्धती चांगली आहे. काही दिवस फक्त आम्हाला यातून जावं लागणार आहे, असं ते म्हणाले.

VIDEO | श्री ठाणेदार यांचा एबीपी माझाशी खास संवाद

वॉशिंग्टन डीसी मधलं वातावरण निवळलं दरम्यान प्रेसिडेंशियल इलेक्शनच्या मतमोजणीच्या दुसर्‍या दिवशी वॉशिंग्टन डीसी मधलं वातावरण जरासं निवळल्याचं चित्र आहे. व्हाईट हाऊसभोवतीची बॅरिकेड्स अजून काढलेली नाहीत, पण आज रस्त्यावरची वर्दळ वाढल्याचं, दुकानांमधली ये-जा वाढल्याचं दिसत होतं. 3 नोव्हेंबरला या शहरांनी जणू श्वास रोखून धरला होता, तो हळूहळू मोकळा झालाय.

जो बायडन विजयाच्या उंबरठ्यावर

अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये  डेमोक्रिटिकचे उमेदवार जो बायडन विजयाच्या जवळ पोहोचले आहेत. जो बायडन बहुमताच्या अगदी जवळ पोहोचले असून त्यांना 264  इलेक्टोरल वोट मिळाले आहेत, त्यांना विजयासाठी केवळ 6 मतांची गरज आहे. तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर असून त्यांना आतापर्यंत 214 इलेक्टोरल वोट मिळाले आहेत. विजयासाठी उमेदवाराला 270 इलेक्टोरल मतांची गरज आहे. दुसरीकडे निवडणूक प्रक्रियेत घोटाळ्याचा आरोप करत डोनाल्ड ट्रम्प सुप्रीम कोर्टात पोहोचले असल्याची माहिती आहे. त्यांनी कालच या संदर्भात आरोप केले होते. आज त्यांनी कोर्टात केस दाखल केली आहे.

प्रक्रियेवर आणि एकमेकांवर विश्वास ठेवा, आपण जिंकू- बायडन अध्यक्षपदाच्या निवडणुकी जो बाइडन विजयाच्या जवळ पोहोचले आहेत. त्यामुळे आता त्यांना आपल्या विजयाबाबत खात्री असल्याचं दिसत आहे. त्यांनी आज पहाटे साडेपाचच्या सुमारास केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "या प्रक्रियेवर आणि एकमेकांवर विश्वास ठेवा, आपण जिंकू." बायडन म्हणाले की, चित्र आता स्पष्ट आहे, आपण चांगल्या मतांनी जिंकत असल्याचे दिसत आहे. जेव्हा मतगणना थांबेल तेव्हा आपणच विजेता असणार आहोत.  ते म्हणाले हा विजय केवळ माझा किंवा आपला नसेल तर हा विजय प्रत्येक अमेरिकी नागरिकांचा असेल.

संबंधित बातम्या

US Elections : अमेरिकन राष्ट्रपतीपदाची निवडणूक रोमांचक टप्प्यावर! निकाल लांबणीवर, मतगणनेत घोटाळ्याचा आरोप

US Elections: 'माझ्यासाठी जिंकणं सोपं, हार पचवणं कठिण', मतदानादरम्यान ट्रम्प यांचं ट्वीट

US Election Results LIVE | बायडन 270 च्या जादुई आकड्याजवळ पोहोचले, ट्रम्प अद्याप मागे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget