पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
विमानातील पायलट-इन-कमांड म्हणजे कॅप्टनची पहिली स्क्रीनिंग टेस्ट non-negative आली होती, म्हणजेच या चाचणीत काहीतरी संकेत मिळाले.

नवी दिल्ली : गेल्याच आठवड्यात दिल्ली ते फुकेट प्रवासादरम्यान एअर इंडियाच्या (Air india) विमानात धक्कादायक घटना घडली होती. 4 ऑगस्ट रोजी एअर इंडियाचे विमान AI-2379 अचानक हलू लागले, भूकंपाच्या धक्क्याप्रमाणे या विमानाला (Airplane) हादरा बसल्याने सर्वच प्रवासी घाबरले होते. विमान काही क्षणांसाठी अचानक खाली आले. मात्र, वैमानिकांनी तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवत विमान सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर उतरवले. आता या विमान अपघात संदर्भाने तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. एअर इंडिया फुकेट-दिल्ली विमानाच्या पायलट-इन-कमांड (PIC) ची दुसरी डोप चाचणीही पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे. त्यामुळे, वैमानिक नशेत होते का? याचा तपास सुरू झाला आहे.
विमानातील पायलट-इन-कमांड म्हणजे कॅप्टनची पहिली स्क्रीनिंग टेस्ट non-negative आली होती, म्हणजेच या चाचणीत काहीतरी संकेत मिळाले. त्यानुसार, पुढील चाचणी घेण्यात आली. पायलटची Confirmatory टेस्ट घेण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता दुसऱ्या चाचणीतही रिझल्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे, पहिल्या टेस्टनंतर आता दुसऱ्या टेस्टमध्येही डोपिंग पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. पहिली स्क्रीनिंग टेस्ट non-negative आल्यानंतर पायलटचे सँपल लॅबमध्ये चाचणीसाठी पाठवण्या आले होते.
याप्रकरणाच्या तपास प्रक्रियेनुसार, या घटनेचा तपास सुरू असेपर्यंत विमानातील दोन्ही वैमानिकांना फ्लाइंग रोस्टर वरुन हटविण्यात आले हे. दरम्यान, आता डोपिंग पॉजिटिव आल्याने विमान अचानक उंचीवरुन कमी होण्याच्या घटनेशी याचा संबंध आहे की नाही, याचा तपास करण्यात येणार आहे. 4 ऑगस्ट रोजी फुकेट ते दिल्ली मार्गावर उड्डाण घेतलेल्या एअर इंडियाचे AI-2379 (A320 विमान वीटी-ईएक्सओ) विमान अचानक जवळपास 300 फूट खाली आले होते. मात्र, सुदैवाने हे विमान नंतर सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर लँड झाले. मात्र, आता विमानातील कॅप्टनची डोपिंग टेस्ट पॉझिटीव्ह आल्याने याची सखोल चौकशी होणार आहे.
फ्रान्सची तपास संस्था मदत करणार
फ्रान्सची विमान अपघात तपास संस्था BEA (Bureau of Enquiry and Analysis for Civil Aviation Safety) आणि एअरबसच्या तज्ज्ञांची टीम या तपासात AAIB ला मदत करणार आहेत. या घटनेचा तपास आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (ICAO) Annex 13 नुसार Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) कडून केला जात आहे. Annex 13 मध्ये विमान अपघात आणि विमानाशी संबंधित घटनांच्या तपासाची प्रक्रिया नमूद करण्यात आली आहे. यापूर्वी, 4 ऑगस्ट रोजीच्या उड्डाणादरम्यान विमानात अनेक तांत्रिक बिघाड झाले होते. त्यामध्ये ऑटोपायलट मोड अचानक डिस्कनेक्ट होणे, याचाही समावेश होता.
एअर बसकडून तपास यंत्रणांना मदत
“ICAO Annex 13 नुसार, संबंधित तपास यंत्रणेला एअरबसकडून तांत्रिक मदत दिली जात आहे. आम्ही विमान कंपनीला सक्रियपणे सहकार्य करत असून, अधिक माहिती उपलब्ध होताच ती देण्यात येईल. तपासात मदत करण्यासाठी तज्ज्ञांची एक टीम पाठवण्यात येत आहे.”, असे एअरबसच्या प्रवक्त्याने आपल्या निवेदनातून म्हटले होते. दरम्यान, Airbus A320 हे विमान फ्रान्समध्ये उत्पादित झाले असल्याने फ्रान्सची विमान अपघात तपास संस्था BEA देखील या तपासात सहभागी होत आहे.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या





















