एक्स्प्लोर

Nuclear Attack : पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली

Jiang Xueqin Nuclear Attack Claim : डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिका-इराण युद्धाची अचूक भविष्यवाणी करणारे प्राध्यापक जिआंग ज्युक्विन यांनी आता भारत आणि पाकिस्तान युद्धासंबंधी भीती व्यक्त केली आहे. 

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर एका प्रसिद्ध भू-राजकीय तज्ज्ञाच्या दाव्यामुळे जागतिक स्तरावर नव्या चर्चेला उधाण आले आहे. चीनमध्ये जन्मलेले कॅनेडियन प्राध्यापक आणि जिओपॉलिटिक्सचे जाणकार जिआंग ज्युक्विन (Jiang Xueqin) यांनी असा दावा केला आहे की, भविष्यात जर युद्ध किंवा मोठा संघर्ष उद्भवला, तर पाकिस्तान सर्वात आधी अण्वस्त्रांचा (Nuclear Weapons) वापर करू शकतो.

प्राध्यापक ज्युक्विन यांनी यापूर्वी केलेल्या अनेक राजकीय भविष्यवाण्या हुबेहूब खऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या या ताज्या विधानाची जागतिक माध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

Jiang Xueqin Podcast Claim : पाकिस्तानकडे तातडीने नियंत्रण ठेवणारी यंत्रणा नाही

'राज शमानी' (Raj Shamani) यांच्या प्रसिद्ध पॉडकास्ट कार्यक्रमात प्राध्यापक जिआंग ज्युक्विन यांना अणुयुद्धाच्या शक्यतेबाबत विचारण्यात आले होते. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, "ज्या देशांकडे अण्वस्त्रे आहेत, त्यामध्ये पाकिस्तानचा समावेश आहे. मात्र, पाकिस्तान हा अत्यंत कमकुवत, अव्यवस्थित आणि भ्रष्ट देश आहे. आपत्कालीन किंवा अत्यंत बिकट परिस्थितीत स्वतःला अण्वस्त्र हल्ल्यापासून रोखण्यासाठी आवश्यक असणारी मजबूत 'कंट्रोल सिस्टीम' पाकिस्तानकडे उपलब्ध नसावी, अशी मोठी शक्यता आहे. त्यामुळे घाबरून किंवा बचावात्मक पवित्रा म्हणून ते आधी अण्वस्त्र वापरू शकतात."

India's Nuclear Policy : भारताची 'नो फर्स्ट यूज' पॉलिसी 

या चर्चेदरम्यान प्राध्यापक ज्युक्विन यांनी भारताच्या अण्वस्त्र धोरणाचे (India's Nuclear Doctrine) कौतुक केले. अणुहल्ल्याबाबत भारताची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. भारत 'नो फर्स्ट युज' (No First Use ) म्हणजे आधी अण्वस्त्र वापरणार नाही, या धोरणावर ठाम आहे. भारताकडे संरक्षणाच्या दृष्टीने केवळ अण्वस्त्रेच नव्हे, तर इतरही अनेक आधुनिक लष्करी आणि तांत्रिक क्षमता आहेत ज्या भारताला मजबूत बनवतात. याउलट, पाकिस्तानकडे अशा पर्यायी क्षमतांचा पूर्णपणे अभाव आहे."

Jiang Xueqin Predictions : कोणत्या भविष्यवाण्या ठरल्या खऱ्या?

प्राध्यापक जिआंग ज्युक्विन हे सध्या सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. त्यांनी यापूर्वी केलेल्या दोन मोठ्या आंतरराष्ट्रीय भविष्यवाण्या अचूक ठरल्या आहेत:

1. डोनाल्ड ट्रम्प यांचे पुनरागमन : त्यांनी 2024 च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुनरागमनाची अचूक भविष्यवाणी केली होती.
2. अमेरिका-इराण संघर्ष : अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य युद्धाबाबत त्यांनी मांडलेला अंदाजही खरा ठरला होता.

जागतिक स्तरावर दुसऱ्या महायुद्धानंतर अद्याप कोणत्याही देशाने अणुबॉम्बचा प्रत्यक्ष वापर केलेला नाही. मात्र, पाकिस्तानमधील अस्थिर राजकीय व लष्करी परिस्थितीमुळे अणुबॉम्बच्या सुरक्षेवर प्राध्यापक ज्युक्विन यांनी मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nuclear Attack : पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली
पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली
Gen-Z Populations : Gen-Z लोकसंख्येमध्ये शेजारच्या चीन अन् पाकिस्तानमध्ये कुणाची आघाडी? पुरुष आणि महिलांच्या आकडेवारीची रंजक माहिती, वाचा सविस्तर
Gen-Z लोकसंख्येमध्ये शेजारच्या चीन अन् पाकिस्तानमध्ये कुणाची आघाडी? पुरुष आणि महिलांच्या आकडेवारीची रंजक माहिती, वाचा सविस्तर
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
Advertisement

व्हिडीओ

Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Embed widget