Helicopter Crash : अमेरिकेच्या नॅशनल गार्डचे हेलिकॉप्टर टेक्सासमध्ये कोसळले, 3 जणांचा मृत्यू
Helicopter Crash : या विमानातील तीन जणांचा मृत्यू झाला. तर चौथ्या प्रवाशाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे
Helicopter Crash : टेक्सासमध्ये (Texas) अमेरिका-मेक्सिको सीमेवर हेलिकॉप्टर कोसळले. या विमानात तीन नॅशनल गार्ड सदस्य आणि एक बॉर्डर पेट्रोल एजंट होते. टेक्सासच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमानातील तीन जणांचा मृत्यू झाला. तर चौथ्या प्रवाशाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. स्टार काउंटीचे न्यायाधीश एलॉय वेरा यांनी सांगितले, स्टार काउंटीमधील ला ग्रुलाजवळ हा अपघात झाला.
छोट्याशा गावात हा अपघात झाला
इलॉय वेरा यांनी सांगितले की, स्टार काउंटीमधील ला ग्रुलाजवळ हा अपघात झाला. ला ग्रुल्ला टेक्सासच्या रियो ग्रांडे व्हॅलीमध्ये आहे. स्टार काउंटी शेरीफ कार्यालयाने याबाबत शुक्रवारी फेसबुकवर पोस्ट केली की, ते काउंटीच्या पूर्वेकडील भागात पडलेल्या हेलिकॉप्टरला प्रतिसाद देत आहे. टेक्सास सार्वजनिक सुरक्षा विभागाचे लेफ्टनंट क्रिस्टोफर ऑलिव्हारेझ यांनी सांगितले की, ला ग्रुला या छोट्याशा गावात हा अपघात झाला.
जानेवारीतही विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते
यापूर्वी, जानेवारीमध्ये, मेक्सिकोच्या राज्याच्या सीमेवर गस्त घालणारे टेक्सास विभागाचे सार्वजनिक सुरक्षा हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते. मात्र सहवैमानिकाच्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून हेलिकॉप्टरचे मोठे नुकसान झाले आहे. टेक्सास सरकारच्या ऑपरेशनचा भाग म्हणून हेलिकॉप्टर आकाशात झेपावले होते.
हेही वाचा>>>
Texas Car Accident : नाताळच्या सुट्टीसाठी अमेरिकेत गेलेल्या 6 भारतीयांवर काळाचा घाला! भीषण अपघातात जागीच मृत्यू, आमदाराचे नातेवाईक