एक्स्प्लोर

Crime : बाप नव्हे हैवान! मुलगी घरी न दिसल्याने आधी बेदम मारहाण, नंतर मृतदेह पुरला, 'असा' झाला घटनेचा खुलासा

Jharkhand Crime : तीन दिवसांपूर्वी जमिनीत गाडलेल्या 16 वर्षीय मुलीचा मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला. त्यानंतर पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली

Jharkhand Crime : बाप म्हणजे घराचा आधार, एक वटवृक्ष, ज्याच्या सावलीत संपूर्ण कुटुंब सुरक्षित असते. पण तोच बाप जेव्हा हैवान बनतो, तेव्हा अनर्थ होतो, अशीच एक घटना  झारखंडच्या पलामू जिल्ह्यात घडलीय. या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीच्या हत्येचा खुलासा पोलिसांनी केलाय. आपल्या पोटच्या लेकीचा खून करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तिचे वडील असल्याचे निष्पन्न झाले. ज्यामुळे तो बाप नाही तर एक हैवान असल्याचं समोर आलंय. या बापाने लेकीला बेदम मारहाण करून हत्या केली. नंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी काही लोकांना सोबत घेऊन तिचा मृतदेह जमिनीत गाडला. मात्र तीन दिवसांनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा करत चार जणांना अटक केली. मात्र मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.

 

आपल्या मुलीला एवढी मारहाण केली की...

पलामू जिल्ह्यात सुमारे तीन दिवसांपूर्वी जमिनीत गाडलेल्या 16 वर्षीय मुलीचा मृतदेह पोलिसांनी शुक्रवारी जमिनीतून बाहेर काढला. ही घटना रांचीपासून 175 किलोमीटर अंतरावर असलेल्या चैनपूर पोलिस स्टेशन परिसरात घडली. सलतुआ गावात एका व्यक्तीने आपल्या मुलीला एवढी मारहाण केली की तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती देताना पलामूच्या पोलीस अधीक्षक रेश्मा रामसन यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, मुलीचा मृतदेह दोन ते तीन दिवस जुना दिसत आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मेदिनीराय मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये (MMCH) पाठवण्यात आला. जिथे मुलीच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले.

 

मुलगी घरी न दिसल्याने आरोपी चिडला, आणि मग...

एसपी रामसेन यांच्या म्हणण्यानुसार, पोलीस अजूनही मुलीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत. या प्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींनी या निघृण गुन्ह्यासाठी अल्पवयीन मुलीच्या वडिलांना जबाबदार धरलंय. आरोपीने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, काही दिवसांपूर्वी आपली मुलगी घरी न दिसल्याने आरोपी चिडला होता. ती घरी परतल्यावर तो तिच्याशी भांडू लागला. दरम्यान, दारूच्या नशेत असलेल्या वडिलांनी आपल्या मुलीला एवढी मारहाण केली की, तिचा मृत्यू झाला. यानंतर काही ग्रामस्थांच्या मदतीने या बापाने आपल्या मुलीचा मृतदेह पुरला.

 

पोलिसांची दिशाभूल करत होता बाप!

गुरूवारी मध्य प्रदेशातील छतरपूरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली होती. येथे एका बापाने आपल्याच मुलीची हत्या केली. आपला गुन्हा लपवण्यासाठी खुनी पित्याने आधी आपल्या मुलीचा मृतदेह पोत्यात बांधून जंगलात नेऊन विहिरीत फेकून दिला आणि नंतर पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. तो प्रत्येक टप्प्यावर पोलिसांची दिशाभूल करत होता पण अखेर त्याचा गुन्हा उघडकीस आला आणि पोलिसांनी त्याला अटक केली होती.

 

 

 

हेही वाचा>>>

Crime : सॉरी बाबा.. मी JEE करू शकत नाही... सुसाईड नोट लिहत विद्यार्थ्याची आत्महत्या, राजस्थानच्या कोटामधील सहावी घटना

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget