एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
इंग्लंडच्या संसदेबाहेर पोलिसावर चाकूहल्ला, दोन हल्लेखोर ठार
लंडन: इंग्लंडच्या संसदेवर दोन हल्लेखोरांनी हल्ला केला. पण यामध्ये त्यांच्या प्रयत्न फसला. हल्लेखोरांनी संसदेबाहेर एका पोलीस अधिकाऱ्याला चाकूनं भोसकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी संसदेच्या सुरक्षा रक्षकांनी दोन हल्लेखारांना कंठस्नान घातल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. गोळीबारानंतर संसदेची इमारत बंद करण्यात आली आहे.
सध्या ब्रिटनच्या संसदेचं सत्र सुरु आहे. याचवेळी संसदेच्या परिसरात गोळीबार आणि चाकू हल्ल्याची घटना घडली. तर दुसरीकडे त्याचवेळी संसद परिसरातील एका ब्रीजवर एका कारनं तब्बल सहा ते आठ जणानां चिरडलं आहे. या सर्व प्रकारानंतर या परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे.
दरम्यान, हा सर्व प्रकार सुरु असताना इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यादेखील त्याच परिसरात होत्या. मात्र, आता त्यांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. या हल्ल्यामागे नेमकं कोण आहे हे अजून अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, पोलीस सध्या या संपूर्ण हल्ल्याचा सखोल तपास करत आहेत.
गेल्या वर्षी याच दिवशी ब्रसेल्समध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्या पार्श्वभूमीवर युरोपीय देशांतील अनेक शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
शेत-शिवार
मुंबई
Advertisement